सध्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक होत आहेत. असे असताना पैठणचे आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या नावावर 1 लाख 31 हजार 160 रुपयांची विजेची थकबाकी आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. पैठण तालुक्यातील 4 हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडण्यात आली आहे.
यातील 3 हजार 716 शेतकऱ्यांनी थकीत बिल भरणा केला आहे. असे असले तरी त्यांना वीज मिळत नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून, खरीप हातून गेला आहे. दरम्यान आता रब्बीच्या हंगामात तरी मागील भरपाई भरून निघेल अशी उम्मीद घेऊन शेतकरी कामाला लागला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.
अनेक राजकीय नेत्यांकडे लाखोंची थकबाकी असतांना देखील त्यांना दिलासा दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची वीज कनेक्शन बंद करण्यात आली आहेत, मात्र औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मुलाकडे मात्र 1 लाख 31 हजार 160 रुपयांची विजेची थकबाकी आहे.
गुजरात कोणाच? विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क
याठिकाणी दहा-वीस हजारांसाठी शेतकऱ्यांची वीज बंद केली जात असतांना, मंत्र्यांच्या मुलावर लाखो रुपयांची थकबाकी असतांना आता त्यांचे वीज कनेक्शन महावितरण बंद करणार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे सरकारवर शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.
आता एसटीत द्या ऑनलाइन पैसे, सुट्या पैशांची कटकट मिटणार..
दरम्यान, भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांची पाचोड येथील गट नंबर 276 मध्ये ग्राहक क्रमांक 493260467413 चे वीज मीटर असून, त्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1 लाख 31 हजार 160 रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. यामुळे चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
विश्वास साखर कारखान्याकडून प्रतिटन ३ हजार रुपये वर्ग, कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती
'शेतकर्यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला'
आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे धाबे दणाणले..
Published on: 05 December 2022, 05:53 IST