नाशिक - पुणे सेमी स्पीड रेल्वेमार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या दराबाबत सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आता जनजागृती होत आहे.
मागच्या आठवड्यात या संबंधीच्या जमीन संपादनाची पहिली खरेदीखत सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील एका महिला शेतकऱ्याने करून दिली होती. यामध्ये दुसरे खत बारागाव पिंपरी येथील नऊ शेतकऱ्यांनी 32 गुंठे सामाईक क्षेत्र या रेल्वे प्रकल्पासाठी खरेदीखताने दिले. सिन्नरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हे खरेदीखत नोंदविले गेले. हंगामी बागायती क्षेत्र गृहीत धरून बत्तीस गुंठा साठी 36 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला.
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सोमनाथ दामोदर उगले, संगीता सोमनाथ उगले, जयश्री सुखदेव उगले, सुखदेव दामोदर उगले, किसन दामोदर उगले, कल्पना दत्तात्रेय उगले, मिराबाई संपत उगले इत्यादी मिळून सामूहिक मालकीच्या गटनंबर 359/2 मधील 82 गुंठे क्षेत्र पैकी 32 गुंठे इतके हंगामी बागायती क्षेत्र 36 लाख 21 हजार 144 रुपये मोबदला स्वीकारत पुणे-नाशिक दरम्यान नवीन दुहेरी मध्यम, अति जलद रेल्वे प्रकल्प विद्युतीकरण यासह या सार्वजनिक प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदीखत पद्धतीने अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या खाजगी जमिनीच्या खरेदी खत स्वच्छेने निष्पादित केले. दुय्यम निबंधक किशोर देशमुख यांच्या कार्यालयात महारेल यांच्यावतीने अप्पर महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांच्या लाभात हे खरेदी खत लिहून दिले. याप्रसंगी महारेल चे मंगेश धोरण, महेंद्र गावडे तसेच तहसीलदार राहुल कोताडे, सागर दौंड, गोरख आढाव, विपुल पवार त्यातून सह भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी नाशिक व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार जमीन खरेदी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Breaking : स्वाभिमानी संघटना: हमीभाव कायद्याच्या जनजागृतीचा डंका आता देशभरात वाजणार
नक्की वाचा:खतासंबंधी महत्वाची बातमी! DAP ला मिळाला PROM चा पर्याय, वाचा सविस्तर माहिती
Published on: 12 May 2022, 01:30 IST