News

सध्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांचे काम प्रगतीपथावर असून बरेच महामार्ग हे प्रस्तावित आहेत. तर काही महामार्गाचे काम हे पूर्ण झाले असून लोकार्पण देखील करण्यात येत आहे. काही महामार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने राबवली जात असून भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात देखील आलेले आहे व काही महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे व प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट या लेखात घेऊ.

Updated on 01 December, 2022 2:31 PM IST

 सध्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांचे काम प्रगतीपथावर असून बरेच महामार्ग हे प्रस्तावित आहेत. तर काही महामार्गाचे काम हे पूर्ण झाले असून लोकार्पण देखील करण्यात येत आहे. काही महामार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने राबवली जात असून भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात देखील आलेले आहे

व काही महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे व प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट या लेखात घेऊ.

नक्की वाचा:काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांची काटामारी थांबणार का?

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण

 कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या  जमिनीचे संपादन केलेल्या 964 शेतकऱ्यांना तब्बल 336 कोटी 81 लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात आली असून याबाबतीत मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार या महामार्गाच्या कामात जमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्रति गुंठा दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान भरपाई दिली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांची जमिनी या महामार्गात गेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संबंधित भूसंपादनाची रक्कम वर्ग केले गेले असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. हा महामार्ग चार पदरी असून त्याच्या कामाला आता सुरुवात होणार आहे व या महामार्गाच्या कामासाठीची वर्क ऑर्डर देखील पास करण्यात  आहे. या महामार्गासाठी 24 लाख 10 हजार 264 चौरस मीटर इतकी जमीन संपादित करण्यात आली असून 49 गावातील जवळपास 12,608 शेतकऱ्यांची जमीन यामध्ये संपादित करण्यात आली आहे.

नक्की वाचा:कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना दिली नोटीस, एसबीआय बँकेला बजावला दंड

या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 1290 कोटी 38 लाख रुपयांची गरज असून सदर मागणी महसूल विभागाकडून करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 344 कोटी 69 लाख रुपये रक्कम जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या असून यापैकी 336 कोटी 81 लाख एवढ्या रकमेचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. या महामार्गासाठी पन्हाळा तालुक्यातील जवळजवळ 1937 शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे तर करवीर तालुक्यातील 3155 खातेदारांची जमीन संपादन करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर हातकणंगले तालुक्यातील जवळजवळ 1231 खातेदारांची जमीन संपादित करण्यात आली असून हे सगळे मिळून जवळजवळ 12,608 खातेदारांची 24 लाख 10 हजार 260.30 चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आले आहे.

नक्की वाचा:चीनमध्ये लोकांचा लॉकडाऊनला विरोध, सरकारविरोधातील आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू

English Summary: land acquisition process is complete to kolhapur ratnagiri express way
Published on: 01 December 2022, 02:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)