मित्रांनो, भारतातील शेतकरी आता शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतायेत. एवढेच नाही तर त्या माध्यमातून चांगला नफा देखील ते मिळवत आहेत. असं असलं तरी आपत्कालीन संकट काही सांगून येत नाही. काळानुसारही हवामानात बरेच बदल होत गेले. आणि त्यातून उध्दभवणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती करणं अधिकच जिकिरीचं होत गेलं. आणि हेच आवाहन समर्थपणे पेललंय ते म्हणजे परभणी जिल्ह्यातील वत्ते कुटुंबीयांनी.
सध्या भारतातील शेतकरी बंधू औषधी गुणधर्म असलेल्या पुदिना सारख्या पिकांची लागवड करून चांगला नफा कमावतायेत. परभणी मधील गोविंदपूर येथील वत्ते कुटुंबीयांनी आपल्या शेतातदेखील पुदिना पीकाची लागवड करुन लाखोंचा नफा कमावला आहे. शेतकरी गंगाधर श्यामराव वत्ते, बालाजी गंगाधर वत्ते,आनंदा गंगाधर वत्ते यांनी तीस गुंठे क्षेत्रात पुदिना पीकाची लागवड केली.
त्यांना या तीन वर्षात तीस गुंठ्यातील पुदिनाचं भरघोस असं उत्पादन मिळालं. त्यांच्या विक्रीतून खर्च वगळता आजतागायत त्यांना जवळपास दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. शेतकरी बालाजी वत्ते म्हणतात की या पिकामुळं त्यांना बराच फायदा झाला आहे. हे सुवासिक औषधी वनस्पतीयुक्त पीक असल्यामुळे याचा खाद्यपदार्थांमध्ये देखील वापर केला जातो. शिवाय याचं लागवड क्षेत्रही कमी असल्याने बाजारात याला मोठी मागणी अधिक असते. पुदिना हे पीक एकदा लागवड केले की चार पाच वर्षे चालते.
आलेले पीक कापणी केले की, तेथून पुढे एका महिन्याला परत काढणीला येते तर त्यासाठी १५:१५: १५ या खताचा डोस द्यावा लागतो आणि अळी, बुरशी तसेच पाने पिवळी पडल्यास योग्य त्या औषधाची फवारणी करणं गरजेचंच असल्याचं शेतकरी बालाजी यांनी सांगितलं. पुढं ते असंही म्हणाले की, या पीकाला वाफसा पद्धतीनुसार एक दिवसा आड पाणी द्यावे लागते.
पुदिना साठी लागणार पूर्वनिययोजन आणि अपार कष्ट यातून वत्ते कुटुंबीयांनी आर्थिक समृद्धी साधली आहे. शेतकरी बालाजी वत्ते यांना आपल्या कुटुंबाचीदेखील चांगली साथ मिळाली. पत्नी वंदना आणि आई सारजाबाई यांच्या सहकार्याने बालाजी यांनी पुदिन्याचे यशस्वी असं उत्पादन घेतलं आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंच्या या आदर्श शेतीची राज्यभरात चर्चा होत आहे. आपल्यासाठी ही माहिती आणली होती आमचे प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील यांनी.
अधिक बातम्या:
Farmer Protest : किसान सभा आक्रमक; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार 'लाल वादळ'
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात, बळीराजा संकटात
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योगातून शेतकरी दाम्पत्याची भरारी
Published on: 26 April 2023, 01:57 IST