News

पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील काही भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. यामुळे कृष्णा नदीतून पाणी वाहून जाते. त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. पुराच्या परिणामी जनजीवन आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. यामुळे आता यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on 14 July, 2023 10:08 AM IST

पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील काही भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. यामुळे कृष्णा नदीतून पाणी वाहून जाते. त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. पुराच्या परिणामी जनजीवन आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. यामुळे आता यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

यासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला देणाऱ्या कृष्णा खोरे 'फ्लड डायवर्जन प्रोजेक्ट'ला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता मान्यता दिली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली. हे पाणी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग, सोलापूर आणि मराठवाडा या भागातील जनतेला दिल्यास मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागातील जमीन ओलिताखाली येणार असल्याची बाब निदर्शनास खासदार निंबाळकर यांनी आणून दिली.

तुमच्या बागेत ही पाच झाडे लावा, तुमच्या घराची हवा पूर्णपणे करतील स्वच्छ

त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली. हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश आज पारित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेसाठी ही मोठी भेट असणार आहे.

यावर्षी खूपच कमी पावसाची नोंद, कोयना धरण १०० टक्के भरण्याची शक्यता कमीच...

यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होणार असून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लासलगावमध्ये डाळिंब प्रतिक्रेट २०११ रुपये भाव, शेतकऱ्यांना दिलासा..
गोकुळचा चिठ्ठीवरचा कारभार कधी बंद होणार? दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका...
ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर, उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा...

English Summary: Krishna Bhima Stabilization Project approved by Deputy Chief Minister Devendra Fadnavis, drought prone areas will get water
Published on: 14 July 2023, 10:07 IST