रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात काही भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.असं असलं तरी पाऊस लांबणीवर गेला. मात्र काही भागात उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस लांबणीवर गेल्यामुळे पेरणीबाबत शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
काल राज्य मंत्रिमंडळात राज्यातील खरीप पेरणीच्या स्थितीवर चर्चा झाली. मागील वर्षी याच कालावधीत 100% व्याप्तीच्या तुलनेत आता केवळ 13% खरीप क्षेत्रावर पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार राज्यातील खरीप पेरणीच्या असमाधानकारक गतीबद्दल चिंतेत आहे. राज्यात आतापर्यंत १३४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी २७० मिलिमीटर पाऊस पडला होता. म्हणजेच मागील वर्षी पेक्षा यंदा पावसाची सरासरी कमी झाली आहे.
गेल्या वर्षी राज्यातील खरिपाच्या पेरण्या याच तारखेला पूर्ण झाल्या होत्या."यावर्षी, केवळ 20.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जी एकूण क्षेत्राच्या 13% इतकी आहे," असे एका सरकारी प्रकाशनात म्हटले आहे. शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भरघोस पिकांसाठी वेळेत आणि समाधानकारक पाऊस पडणे गरजेचंच आहे.
आता रांगेत थांबण्याचे टेन्शन मिटणार!! CNG संपल्यावर एका कॉलवर मिळणार टाकी भरून
महाराष्ट्र हे कापूस आणि सोयाबीनचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक आहे. पावसावर अवलंबून असलेल्या सर्वात जास्त क्षेत्रांपैकी एक आहे. राज्य सरकार बुधवारी शहरांच्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. मुंबईने आधीच पाणीकपात सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
गव्हानंतर तांदूळ निर्यातीवरही बंदी? भारतात तांदळाची किंमत १० टक्क्यांनी वाढली
अबब! शेतकऱ्याला सापडल्या नोटांनी भरलेल्या गोण्या; वाचा नेमकं पुढे काय झालं...
Published on: 29 June 2022, 04:22 IST