खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन खरीप कांदा रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणीनंतर दोन गुंठे (२०० वर्ग मीटर) क्षेत्रासाठी ८०० ग्रॅम नत्र द्यावे. पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा.
दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी. तुषार सिंचन पद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत. रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण फूलकिडे (थ्रीप्स) (फवारणी प्रति लिटर पाणी) फिप्रोनिल १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान २ मि.लि.
मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्राव��� करून रोपांच्या ओळीत ओतावे. करपा रोग (फवारणी प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. फवारणीवेळी ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.
तूरडाळीचे भाव पुन्हा वाढले! शेतकऱ्यांना अच्छे दिन...
कांदा लागवडी नुसार पाहिले तर त्याचे तीन हंगामात वर्गीकरण करता येते. खरीप, रांगडा हंगाम व रब्बी हंगाम अशा तीनही हंगामात हे पीक घेतले जाते. जर टक्केवारीनुसार या क्षेत्राचा विचार केला एकूण क्षेत्रापैकी सरासरी 20 टक्के क्षेत्र हे खरीप, 20 टक्के क्षेत्र हे लेट खरीप म्हणजे रांगडा, आणि 60 टक्के क्षेत्र हे रब्बी हंगाम मध्ये राहते.
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन व दर्जा चांगला राहतो चांगला राहतो परंतु बाजारभाव कमी मिळतो. त्या तुलनेत नोव्हेंबर ते मार्च महिन्यात येणाऱ्या खरीप व लेट खरीप कांद्याला बाजार भाव चांगला मिळतो. खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन थोडे कमी मिळते.
सोयाबीन लागवड
अखेर राज्यात पावसाला सुरुवात, 'या’ ठिकाणी आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी…
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
Published on: 12 June 2023, 11:09 IST