News

भारतीय समाज व्यवस्थेत गायीचे महत्व अनन्यसाधारण आहे. दिल्ली विकास मंत्री गोपाल राय यांनी 8 जून 2022 रोजी नजफगढमधील डाबर हरे कृष्णा गोशाळेला भेट दिली होती.

Updated on 09 June, 2022 6:14 PM IST

भारतीय समाज व्यवस्थेत गायीचे महत्व अनन्यसाधारण आहे. दिल्ली विकास मंत्री गोपाल राय यांनी 8 जून 2022 रोजी नजफगढमधील डाबर हरे कृष्णा गोशाळेला भेट दिली होती. या गोशाळेला दिल्लीतील स्मार्ट मॉडेल गोशाळा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्यामध्ये गायीच्या शेणाचा वापर इंधन तयार करण्यासाठी केला जाईल. एवढंच नाही तर दिल्लीतील प्रत्येक गोशाळा विकसित करण्याचा पायलट प्रोजेक्ट या मॉडेलवर सुरू करण्यात आला आहे.

प्रत्येक गोशाळा, आदर्श गोशाळा
दिल्लीच्या मॉडेल गोशाळेत IGL द्वारे सौर ऊर्जा संयंत्र आणि बायोगॅस संयंत्र देखील स्थापित करण्यात येईल. यातून बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या अवशेषांपासून कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, यासाठी भविष्यात बरीच मागणी केली जाईल. या संदर्भात, दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी गोशाळेला भेट दिल्यानंतर, जुन्या संरचनेवर बांधलेल्या त्याच्या पॉवर प्लांटचे उद्घाटन केले. या प्रकल्पातून 500 किलोवॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

बायोगॅस तसेच सेंद्रिय खतांची निर्मिती
डाबर हरे कृष्णा गोशाळा सुमारे २४ एकर क्षेत्रफळात पसरलेली आहे, जी प्रामुख्याने ५ मेगावॅट वीज निर्माण करेल. तसेच, गोशाळेच्या मुख्य गेटसमोर IGL द्वारे बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा व या बायोगॅसच्या अवशेषांपासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे गोशाळेचे हे मॉडेल आधुनिक सुविधांसह स्मार्ट गोशाळेत रूपांतरित होताच त्यातून रोजगारही निर्माण होणार आहे.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या; झाडाचा आसरा घेणं मेंढपाळ्याला पडलं महागात...

स्मार्ट मॉडेल सिटी
या गोशाळेला भेट दिल्यानंतर दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय म्हणाले की, "केजरीवाल सरकार दिल्लीला स्मार्ट मॉडेल सिटी म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने आम आदमी पार्टी प्रयत्न करत आहे. दिल्लीतील सर्व गोशाळांचे स्मार्ट गोशाळांमध्ये रूपांतर झाल्यास दिल्लीतील गुरांना त्यांच्या अनुषंगाने वातावरण मिळेल आणि त्याचबरोबर या भागातील लोकांना जास्तीत जास्त रोजगारदेखील मिळेल.

दिल्लीतील गोशाळांना स्मार्ट गोशाळा बनवण्याच्या पहिल्या टप्प्यात नजफगडच्या डाबर हरे कृष्ण गोशाळेची निवड करण्यात आली आहे. या मॉडेल अंतर्गत या गोशाळेचा पूर्ण विकास होताच दिल्लीतील इतर गोशाळांचेही काम वेगाने सुरू होईल.

रोजगाराची निर्मिती
विशेष म्हणजे या गोठ्यात सर्व गायींच्या राहण्याची योग्य सोय असल्याने त्यांच्या चारा, उपचार, औषध आणि फिरण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध होणार आहे. दिल्लीतील या सर्व गोशाळा भविष्यात स्वयंपूर्ण आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने विकसित केल्या जातील. मंत्री गोपाल राय पुढे म्हणाले की, "या गोशाळा रोजगार निर्मितीसाठी देखील काम करतील आणि त्यांचे उत्पन्न देखील वाढेल".

कृषी क्षेत्राला चालना
हे मॉडेल कृषी क्षेत्रासाठीही फायदेशीर ठरेल, कारण दिल्लीतील या सर्व गोशाळांमध्ये वेळोवेळी शेतकरी, पशुपालक, पर्यावरण रक्षक आणि इतर संबंधितांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
चिंता वाढली! कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; जाणून घ्या आजची आकडेवारी
खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांची लूट; कृषी विभागाने खत विक्रेत्यांना दिला मोठा दणक

English Summary: Kejriwal government's big announcement; Produce biogas and organic fertilizers from Goshala
Published on: 09 June 2022, 06:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)