राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे करत आहेत. आता मागील दोन वर्षांत मतदारसंघातील ४३ गावांमध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून केलेल्या ओढा-नाला खोलीकरण, रुंदीकरण, नाला बंडींग, नदी खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे, माती बांध घालणे, ही कामे सुरू आहेत.
तसेच डिपसीसीटी या जलसंधारणाच्या कामांमुळं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे २०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. त्याचा १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
त्याचप्रमाणे यंदाही रवळगाव, मिरजगाव, चिंचोली काळदात, मुंगेवाडी, पोतेवाडी, झिक्री, नायगाव या ८ गावांमध्ये जलसंधारणाची कामं पूर्ण झाली असून कापरेवाडी, निंबे, चांदे खु. सतेवाडी, कोल्हेवाडी, कुसडगाव (भोगलवाडी), खर्डा या ७ गावांत कामं सुरु आहेत. याबाबत रोहित पवार यांनी पोस्ट करून माहिती दिली आहे.
नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्ती! शेतकरी बसणार उपोषणाला..
यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून परीसरातील नव्याने सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रातील विहिरी, बोअरवेल यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
राज्यातील ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी मैदानात..
धक्कादायक! मराठवाड्यात तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या, दररोज दोन जणांच्या आत्महत्या..
शेतकऱ्यांनो जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो मृत्यू...
Published on: 05 April 2023, 02:26 IST