बिहारमध्ये महाआघाडीचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयाचीही विभागणी झाली. मंत्रालयातील बहुतांश मंत्री राजदचे होते. पण मंत्रालयाची विभागणी होताच राजद नेते आणि आमदार कार्तिकेय सिंह यांना कायदा मंत्री बनवण्यावरून वाद निर्माण झाला. वास्तविक, कोर्टाकडून अपहरण प्रकरणात कार्तिकेय सिंह विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. 16 ऑगस्टला ते शरण येणार होते.
असे असताना मात्र ते न्यायालयात हजर झाले नाही, त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी कार्तिकेय सिंह यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, मी निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, यात माझ्याविरुद्ध कोणतेही वॉरंट नाही. सर्वकाही स्पष्ट आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा ही अफवा आहे.
दरम्यान, 2014 मध्ये राजीव रंजन यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. बिहारचे कायदा मंत्री कार्तिकेय सिंह हे देखील राजीव रंजन अपहरण प्रकरणात आरोपी आहेत ज्यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. ते 16 ऑगस्टला हजर होणार होते मात्र त्यादरम्यान ते शपथ घेत होते. कार्तिकेय सिंह यांनी कोर्टापुढे शरणागती पत्करलेली नाही किंवा जामिनासाठी अर्जही केलेला नाही.
तरुणांनो मोठ्या प्रमाणावर दारू प्या!! सरकारनेच केले आवाहन, वाचा काय आहे कारण...
या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी या प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत मी माहिती घेईन आणि त्यानंतरच उत्तर देऊ, असे ते म्हणाले. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले की, जर कार्तिकेय सिंग (आरजेडी) विरोधात वॉरंट असेल तर त्यांनी आत्मसमर्पण करायला हवे होते.
'जशा मुली 'बॉयफ्रेंड' बदलतात तसे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवा पार्टनर निवडला आहे'
त्यांनी मात्र कायदामंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मी नितीश यांना विचारतो की ते बिहारला पुन्हा लालूंच्या काळात नेण्याचा प्रयत्न करत आहेत का? कार्तिकेय सिंह यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशीही मागणी केली जात आहे. कार्तिकेय सिंह यांनी कायदा मंत्रीपदाची शपथ घेतल्याने बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपने नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय करायचे या भरमसाठ फी घेणाऱ्या खाजगी शाळेचे? फी न भरल्यामुळे शिक्षकाची विद्यार्थाला जबर मारहाण, विद्यार्थ्याचा मृत्यू..
आता वाढीव वीज बिलाची कटकटच मिटली! जेवढे पैसे भराल तेवढीच वीज मिळणार
65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याची संपत्ती बघून डोळे होतील पांढरे, 6 घरे, सिनेमा हॉल, रोख रक्कम, सोनं..
Published on: 20 August 2022, 10:48 IST