News

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, "पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले. तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

Updated on 14 November, 2022 9:17 AM IST

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, "पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले. तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. विवियाना मॉलमधील (Thane News) मारहाण प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मोठा राडा झाला होता, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाडांवर दाखल होणारा हा दुसरा गुन्हा आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

FRP: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच, आंदोलन पेटण्याची शक्यता

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. हाच मुद्दा घेऊन त्यांनी ठाण्यात या चित्रपटाचे शो बंद पाडले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यासोबतच आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मागील साधारण ३ दिवसांमध्ये आव्हाड यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

8 दिवसांपासून अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी सांगितले कारण...

याच कारणामुळे ७२ तासांत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल केले, म्हणत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा हा ३५४ कलमांतर्गत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या;
पुन्हा पाऊस! पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता..
काश्मीरचे सफरचंद आता पुण्यात पिकतय, भोरच्या शेतकऱ्याची कमाल..
गुजरात निवडणुकीचा देशाला फायदा? पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..

English Summary: Jitendra Ahavad announced his resignation from MLA,
Published on: 14 November 2022, 09:17 IST