यावर्षी जून महिन्यात पाऊस पडला नसल्याने शेतकरी चिंतेत होते. असे असताना जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. असे असताना आता मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील (Jayakwadi Dam) उपयुक्त पाणीसाठा शुक्रवारी दुपारी २ वाजता ५९.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. शेतीसाठी आता या पाण्याचा उपयोग होणार आहे.
परिसरात जोरदार पाऊस पडत असून गोदावरी (Godavari River) नदीपात्रातून प्रकल्पात सातत्याने आवक सुरूच आहे. तीन-चार दिवसांत नगर, नाशिक भागातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडीतील पाणीसाठा (Jayakwadi Dam) झपाट्याने वाढतो आहे. असाच विसर्ग सुरू राहीला तर लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेनुसार भरेल. पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. यामुळे आता दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, गुरुवारी जायकवाडीत ४२ हजार २२३ क्युसेकने आवक सुरू होती. शुक्रवारी सकाळी ६ वाजता आवकेत पुन्हा वाढ होऊन ती ४७ हजार ९७० क्युसेकवर, तर दुपारी दोन वाजता ५१ हजार १११ क्युसेकवर पोहोचली होती. होत असलेली आवक पाहता पाऊस थांबला तरी घटत गेली तरी चार ते पाच दिवस आणखी ही आवक सुरूच राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे देखील सुरू राहणार आहेत.
उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही, संधोधनातून आली महत्वाची माहिती
यामुळे नगर, नाशिक भागांसह प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पाऊस झाल्यास आवकेत वाढ होणार आहे. यामुळे आता लवकरच हे धरण भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. राज्यातील अनेक प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत, तसेच अनेक धरणे ही भरली देखील आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार, नवरीकडून त्याने कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली
धक्कादायक! मगरीने आठ वर्षांच्या मुलाला गिळले, पोटात मुलगा जिवंत असेल म्हणून..
लेट पण थेट! दमदार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग वाढवला
Published on: 16 July 2022, 11:26 IST