सध्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेली पिके वाहून जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे आता शेतकरी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या नित्रुड मंडळामध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने शेतकऱ्यांच्या शेत पिकाच मोठ नुकसान झाल आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. यामध्ये सोयाबीन वाहून गेले आहे. तसेच कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व 25% आगरी विम्याची रक्कम अदा करावी यासाठी किसान सभेने जलसमाधी आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. पंचनामे नको नुकसान भरपाई द्या, असे म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. सध्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन कापूस व इत्यादी पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 25 हजार मदत द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
किसान सन्मान निधीचे २ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा..
यावेळी शेतकऱ्यांनी तलावाच्या काठावर बसून सरकारचा निषेध करण्यासाठी भजन म्हणत मदतीची मागणी केली आहे. या पावसामुळे खरीप पीकं पूर्णपणे हातून गेली आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरकराने सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळत आहे.
ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन; कृषी उन्नती परिषद सुरू, कृषी जागरणतर्फे आयोजन
दरम्यान, राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. यामुळे आता सरकार काय मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
50 हजार प्रोत्साहनपर लाभ योजनेचा 20 ऑक्टोबरपासून शुभारंभ, सहकारमंत्र्यांची माहिती..
दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अंदाज..
शेतकऱ्यांकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून पैशाची मागणी
Published on: 18 October 2022, 11:31 IST