सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला आहे. अनेकांच्या उसाला तुरे आले तरी ऊस तोडला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस तोडला जाणार मगच कारखाने बंद केले जाणार असे सांगितले जात असताना मात्र अनेक कारखाने बंद झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस आता तोडणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राजाच्या गेल्या 5 महिन्यांपासून (Sludge Season) गाळप हंगाम सुरु असून संपूर्ण देशामध्ये 15 मार्चपर्यंत 283 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. यामध्ये राज्यातील १८४ साखर कारखाने सुरु आहेत. तसेच गुऱ्हाळे देखील मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.
असे असताना सध्या महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. महाराष्ट्रात यंदा गाळपाचा कालावधीच वाढला नाही तर साखरेचे उत्पादनही वाढले आहे. एवडे सर्व होऊनही अजून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. राज्यात अजून १५ ते २० टक्के ऊस शिल्लक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे, हे शेतकरी चिंतेत आहेत.
यावर्षी ऊसासाठी वातावरण पोषक राहिल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे. अनेकांना चांगले पाणी उपलब्ध असल्याने अनेकांनी ऊस लावला, मात्र आता त्यांची पंचाईत झाली आहे. काहींनी पहिल्यांदाच ऊस लावला. असे असताना आता त्यांना टेन्शन आले आहे. ऊसाचे गाळप पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाने सुरुच ठेवण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिले आहेत. मात्र आता अनेक कारखाने बंद होत असल्याने चिंता वाढली आहे.
राज्यातील मराठवाडा आणि उत्तर भारतामध्ये ऊस अजूनही फडातच आहे. यामुळे वजनात मोठी घट होणार आहे. काहीतरी पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. सध्या सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हे कारखाने देखील काही दिवसातच बंद होणार आहेत. यामुळे तोपर्यंत सगळ्यांच्या उसाचे गाळप होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, 'ही' पोस्ट वाचून जगण्याची दिशाच बदलेल..
झाडाला फक्त १० टक्केच फळे, कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात; दर वाढण्याची शक्यता
शेतकऱ्यांनो १० दिवस राहिलेत, निम्मीच रक्कम भरायचीय, महावितरणच्या योजनेत व्हा सहभागी..
Published on: 21 March 2022, 05:18 IST