आता शेती करणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. महागाई इतकी की शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी थेट आपले सोनेच गहाण ठेवावे लागत आहे. सध्या महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींच्या किंमती वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सध्या राज्यात पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्यांची कामे खोळंबली आहेत. मावळ तालुक्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच खरीप हंगामातील पेरणी मोठ्या प्रमाणात सुरू होते मात्र यावेळेस बियाणांचे, खतांचे,किटनाशकांचे दर वाढल्याने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तेथील शेतकऱ्यांना सोनेच गहाण ठेवावे लागले. भागात सोने चांदी गहाण ठेऊन लगेच कर्ज मिळत असल्याने शेतकऱ्यांचा सोने चांदी गहाण ठेऊन कर्ज घेण्याकडे कल वाढला आहे.
सोन्यासारखे पीक उगवण्यासाठी शेतकऱ्यांवर सोनेच गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. राज्यात यंदा बियाणांबाबत शेतकऱ्यांची बरीच लूट झाली. कधी बोगस बियाणे देऊन तर कधी अधिक किमतीने बियाणे विकून. महागाई वाढली मात्र शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांकडून कर्ज स्वरूपातील रकमेमध्ये काहीच वाढ झाली नाही.
माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. शेतकरी संतोष महादू शिंदे सांगतात की, शेतीची पूर्वमशागत बी-बियाणे खते यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या म्हणून मग सोन्याची चेन बँकेत गहाण ठेवावी लागली. असे बरेच शेतकरी आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सोने गहाण ठेवत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अखेर शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश; शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द,कर्ज घेणं होणार सोपं
Maharashtra Mansoon News: येणाऱ्या 48 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
Published on: 30 June 2022, 03:03 IST