News

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास सांगितले. ते म्हणाले की यामुळे मातीच्या गुणवत्तेचे संरक्षण होईल आणि पीक उत्पादकता वाढण्यास मदत होईल

Updated on 10 July, 2022 2:54 PM IST

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा(natural farming) अवलंब करण्यास सांगितले. ते म्हणाले की यामुळे मातीच्या गुणवत्तेचे संरक्षण होईल आणि पीक उत्पादकता वाढण्यास मदत होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नैसर्गिक शेती परिषदेला संबोधित केले:

जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेती(natural farming) करता तेव्हा तुम्ही निसर्गाची आणि पर्यावरणाची सेवा करता. तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये सामील व्हाल तेव्हा तुम्हाला गायीची सेवा  करण्याचा बहुमानही  मिळेल, असेही ते म्हणाले. निसर्ग आणि संस्कृतीने भारत हा  कृषी आधारित देश आहे यावर  पंतप्रधानांनी भर दिला. त्यामुळे आपला शेतकरी जसा प्रगत होईल, आपली  शेती (farming) जशी प्रगती करेल आणि समृद्ध होईल, तसाच आपला देशही प्रगती करेल.आपले जीवन, आपले आरोग्य, आपला समाज हा आपल्या कृषी व्यवस्थेचा आधार आहे.

हेही वाचा:खाद्यतेलाच्या किमतीत घट,तेल कंपन्यांनी 15-20 रुपये प्रति लिटर दर कमी केले

डिजीटल इंडिया मिशनच्या अभूतपूर्व यशालाही त्यांनी आवर्जून सांगितले आणि ते म्हणाले की, गावात(village) बदल घडवणे सोपे नाही असे म्हणणाऱ्यांना हे उत्तर आहे. आपल्या गावांनी दाखवून दिले आहे की खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत, तर परिवर्तनाचे नेतृत्वही करू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट  ऑफ  अॅग्रीकल्चर (USDA) नुसार, सेंद्रिय शेतीची व्याख्या सिंथेटिक निविष्ठांचा वापर वगळणारी प्रणाली म्हणून केली जाऊ शकते. सिंथेटिक इनपुटमध्ये हार्मोन्स, कीटकनाशके, खते आणि पशुखाद्य यांचा समावेश होतो.

देशभरात आता राशन कार्ड पोर्टेबिलिटी ,ONORC सेवा सुरू करणारे आसाम हे शेवटचे राज्य

अनेक अभ्यासांनी (study)नैसर्गिक शेतीची परिणामकारकता नोंदवली आहे- बीपीकेपी उत्पादनात वाढ, टिकाव, पाण्याचा वापर, मातीचे आरोग्य आणि शेतजमीन परिसंस्थेमध्ये सुधारणा. रोजगार आणि ग्रामीण विकासाला वाव असलेली ही एक किफायतशीर शेती पद्धती मानली जाते.

English Summary: It is necessary to adopt natural agriculture to maintain soil quality: Prime Minister Narendra Modi
Published on: 10 July 2022, 02:54 IST