News

शेळ्या विकत आणल्या आणल्या असं काही घडलं की ज्याचा विचारही त्यांना केला नव्हता.

Updated on 11 May, 2022 3:53 PM IST

शेतकरी बंधू शेतीसोबत जोड व्यवसायाला प्राधान्य देत असतात. त्याला कारण म्हणजे पारंपरिक शेती करत असताना अनेकदा आपत्कालीन परिस्थिती ओढवते आणि त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. सध्या बरेच तरुण शेती व्यवसायाकडे वळत आहेत. त्यातल्या त्यात शेती क्षेत्रातील आव्हाने बघता तरुण शेतीसोबत पशुपालन क्षेत्राकडे वळत आहेत. शेळीपालन व्यवसाय करूनआपले नशीब आजमावत आहेत.

भिगवण येथील तरुणांनीदेखील असाच काहीसा प्रयत्न केला. शेळी पालन व्यवसाय करून आपले नशीब आजमावण्याच्या त्यांचा उद्देश होता. मात्र शेळ्या विकत आणल्या आणल्या असं काही घडलं की ज्याचा विचारही त्यांना केला नव्हता. नुकत्याच विकत आणलेल्या 54 शेळया या एकामागून एक मृत पावल्या.
या घटनेबाबत अशी माहिती समोर आली आहे की, नितीन पांढरे आणि अतुल घोडके या तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला.


शेळी पालन व्यवसायासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आणि नंतर काष्टी येथील बाजारातून त्यांनी काही शेळ्या खरेदी केल्या. एका पिकप वाहनांमध्ये घालून ते भिगवण येथे आले शिवाय भिगवण येथे आणखी काही शेळ्यांची त्यांनी खरेदी केली आणि शेळ्यांची खरेदी करून ते आपल्या घरी निघाले होते. त्यानंतर काही कळायच्या आताच एकामागून एक शेळ्या अंग टाकू लागल्या त्यामुळे दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीनं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं.

वैद्यकीय अधिकारी जागेवर पोहचेपर्यंत जवळजवळ 54 शेळ्यांनी आपला जीव गमावला. नुकत्याच घेतलेल्या शेळ्या कशा काय दगावल्या याचं आश्चर्य सर्वानाच वाटू लागलं . मोठ्या उमेदीने त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून हे पाऊल उचललं होतं मात्र अचानकच होत्याचं नव्हतं झालं. शेळी पालन व्यवसाय करून उत्पन्न मिळवायची तरुणांची आशा आता पूर्णपणे निराशेत बदलली.

माझ्यासोबत डीपी का ठेवत नाही म्हणून बायको भांडते तरुणाची तक्रार, पुणे पोलीस आयुक्तांचा हटके सल्ला, “नेहमी…”

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत प्राथमिक तपासणी करून चार शेळ्यांचे मृतदेह पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. या संपूर्ण घटनेबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र शिंदे यांनी सांगितले की सदर वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त शेळ्या ठेवल्या गेल्या त्यात वाढता उन्हाळा आणि शेळ्यांची जास्त संख्या जास्त यामुळे त्या गुदमरून मेल्या असण्याची शक्यता आहे.

याशिवाय त्यांना काही विषबाधा झालेली किंवा काय झालं याची माहिती प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच समोर येईल. मात्र या घटनेमुळे नवीन व्यवसाय करु पाहणारे हे दोन्ही तरुणांचा उत्साह निराशेत बदलला आहे. त्यांच्यावर आलेल्या या परिस्थितीमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
Farming Business Idea: 'हा' शेतीपूरक व्यवसाय सुरु करा आणि महिन्याकाठी कमवा एक लाख; वाचा सविस्तर
पिक विम्यासंबंधी महत्वाची माहिती! आता पिकविमा संबंधी राज्यभरात राबवला जाणारा बीड पॅटर्न, कसा आहे हा पॅटर्न?जाणून घेऊ

English Summary: It didn't happen in a moment; 54 goats die in a row
Published on: 11 May 2022, 03:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)