News

सध्या राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान केले आहे. आधी अतिवृष्टी नंतर परतीचा पाऊस अशी एकामागून एक संकटांची मालिका शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक (Financial crisis) अडचणीत सापडला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते, शेतकरी संघटना, आणि राज्यातील शेतकऱ्यांकडून (farmers) राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

Updated on 31 October, 2022 4:59 PM IST

सध्या राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान केले आहे. आधी अतिवृष्टी नंतर परतीचा पाऊस अशी एकामागून एक संकटांची मालिका शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक (Financial crisis) अडचणीत सापडला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते, शेतकरी संघटना, आणि राज्यातील शेतकऱ्यांकडून (farmers) राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे गेल्या काही दिवसांपासून पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. मात्र दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं वक्तव्य केलं.

या वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीकाही झाली. शिवबा संघटनेनीदेखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. 'कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा' अशी मागणी शिवबा संघटनेनी राज्य सरकारकडे केली आहे.

कृषिमंत्र्यांच्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नसल्याच्या बेजबाबदार वक्तव्याची दखल घेऊन त्याचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शिवबा संघटनेकडून केली जात आहे.

ब्रेकिंग: मी बुधवारी राजीनामा देईन; कृषी मंत्र्यांच्या विधानाने खळबळ

पारनेरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पिके अक्षरशः पाण्यावर तरंगत आहेत. मात्र, तरीही शासनाला गांभीर्य नाही. मग नुसते म्हणायला आणि बोलायला हे गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कृषिमंत्री आमच्या शेतकरी बांधवांचे प्रेत पाण्यावर तरंगण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल करत शिवबा संघटनेने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला मदत करा अशी मागणी केली आहे.

पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, व्हिडिओ वायरल

निवेदनावर शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, सरपंच सोमनाथ भाकरे, रोहिदास लामखडे, रमेश वरखडे स्वप्नील लामखडे, शंक वरखडे, खंडू लामखडे, अंकुश वरखडे, राहुल शेटे, संदीप कवाद, नवना बरशिले, राजू लाळगे, नवशाद पठाण, नागेश नरसाळे, यशराज रहाणे, नीले‍श नरसाळे, रोहित मोरे, विकास मोरे ,शांताराम पाडळे,ठकाराम खोडदे, अनिल गागरे, नवनाथ येलकर,निलेश वरखडे इत्यादींच्या सह्या आहेत.

भाजीपाला महागला; शेवगा 200 रुपये किलो, जाणून घ्या इतर भाज्यांचे दर

English Summary: Is the agriculture minister waiting for the corpses of our farmer brothers to float on the water?
Published on: 31 October 2022, 04:59 IST