News

गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील पारा 40 वर पोहचला आहे. त्यामुळे वाढते ऊन आणि बाष्पीभवन वाढल्याने जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठला आहे. उन्हाळी पीके अंतिम टप्प्यात असतानाच पाणी टंचाई निर्माण झाली होती.

Updated on 06 April, 2022 3:40 PM IST

गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील पारा 40 वर पोहचला आहे. त्यामुळे वाढते ऊन आणि बाष्पीभवन (Evaporation) वाढल्याने जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठला आहे. उन्हाळी पीके अंतिम टप्प्यात असतानाच पाणी टंचाई निर्माण झाली होती.

आतापर्यंत उपलब्ध पाणीसाठ्यावर उन्हाळी हंगामातील (Summer Crop) पिकांचा सिंचनाचा प्रश्न मिटला होता. बाष्पीभवन वाढल्याने जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिकांसाठी रेणा प्रकल्पातून (Rena Project) पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे (Irrigation Department) केली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
Sharad Pawar meets PM Modi : शरद पवार मोदींच्या भेटीला; भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत की ED बाबत?
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

पाटबंधारे विभागाचा धडाकेबाज निर्णय

पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील घणसरगाव, रेणापूर आणि खरोळा या बॅरेजेसमध्ये प्रकल्पातून पाणी सोडले आहे. त्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 140 हेक्टरावरील जमिन क्षेत्र हे सिंचनाखाली येणार असल्याने भर उन्हाळ्यात येथील शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे नुकसान तर टळले आहे पण आता उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागलीच निर्णय झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

गेल्या तीन वर्षापासून मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता शेतीसाठी देण्याचा निर्णय सर्वत्रच होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. यामुळे उत्पादनातही भर पडेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : कारखान्याच्या 2100 सभासदांचे सभासदत्व रद्द, वाचा नेमके काय घडले...
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज

English Summary: Irrigation Department's 'that' shocking decision; Even in summer, the farmer is happy
Published on: 06 April 2022, 03:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)