भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी आतापासून बचत (savings) करण्याची गरज आहे. तुम्ही जर सुरक्षित पैसे राहतील अशी योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या 'रिकरिंग डिपॉझिट'मध्ये(Recurring Deposit) गुंतवणूक करू शकता. ही योजना सरकारच्या देखरेखीखाली चालते, त्यामुळे पैसे बुडण्याचा धोका नाही. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खात्यात काही पैसे जमा करून तुम्ही मोठा फंडही तयार करता येतो.
Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 55 टक्क्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट खात्यात पैसे (money) जमा करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. आपल्या सोयीनुसार ठेवी १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे उघडता येतात. त्यात जमा झालेल्या पैशांवर तिमाही व्याज आकारले जाते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी आपल्या खात्यात एक भर दिली जाते.
पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये 18 वर्षांवरील कोणालाही आपलं खातं उघडता येतं. महत्वाचे म्हणजे पालकाच्या वतीने अल्पवयीन मुलाचे खातेही उघडता येते. 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलगा असेल तर त्याच्या नावावरही खातं उघडता येते.
Horoscope: 21 ऑगस्टपासून 'या' राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ; वाचा तुमचे राशीभविष्य
फायदा
पोस्ट ऑफिसच्या (post office) या स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 वर्षानंतर 5.8 टक्के व्याजदराने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. म्हणजेच दर महिन्याला १०००० रुपये लावले आणि त्यावर ५.८ टक्के दराने व्याज मिळाले तर १० वर्षांच्या मॅच्युरिटीवर १६,२८,९६३ रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या
पशुपालकांनो शेळीपालनासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; घ्या 'असा' लाभ
पीक विम्यासाठी सरकारकडून 19 कोटी 69 लाख रुपयांचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा
Animal Husbandry: पशुपालकांनो शेेळ्या-मेंढ्यांची 'अशी' काळजी घ्या; पशुसंवर्धन विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना
Published on: 20 August 2022, 12:29 IST