News

केंद्र सरकार सर्व सामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्याचा लोकांना फायदा होतो. सरकारच्या विमा पॉलिसी योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे.

Updated on 04 August, 2022 4:19 PM IST

केंद्र सरकार (Central Gov) सर्व सामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्याचा लोकांना फायदा होतो. सरकारच्या विमा पॉलिसी योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) पॉलिसीद्वारे तुम्ही फक्त वार्षिक 20 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचे कव्हर मिळवू शकता. म्हणजेच 2 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा (Accidental Insurance) लाभ मिळतो.

पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जातात. दुसरीकडे, जर पॉलिसीधारक अपघातात अपंग झाला तर त्याला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

हे ही वाचा 
Cultivation Of Vegetables: कमी मेहनत जास्त उत्पन्न; 'या' भाजेपाल्याची कधीही करा लागवड

हे लोक घेऊ शकतील लाभ

1) ही विमा पॉलिसी (PMSBY Scheme Benefits) खरेदी करण्यासाठी तुमचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे.

2) ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर, ती 1 जून ते 31 मे पर्यंत वैध राहते. यानंतर तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट म्हणून 20 रुपये कापले जातील.

3) यानंतर पुढील वर्षासाठी पॉलिसी ऑटो रिन्यू केली जाईल. यापूर्वी, या पॉलिसीसाठी लोकांना 12 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागत होता, जो जून 2022 मध्ये वाढवून 20 रुपये करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 
Insecticide: शेतकरी मित्रांनो घरीच बनवा नैसर्गिक किटकनाशक; पैशांची होईल मोठी बचत
Cultivation Of Plants: होय खरंय! फळापासून पानापर्यंत मिळणार भरघोस कमाई; करा 'या' वनस्पतीची लागवड
Modern Agriculture: आधुनिक शेतीतून 'हे' गाव करतय लाखोंची कमाई; जाणून घ्या सविस्तर

English Summary: Insurance Policy just Rs 20 in 2 lakh
Published on: 04 August 2022, 04:19 IST