गेल्या काही दिवसांपासून देशात मोठी महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा आर्थिक बुर्दड बसत आहे. आता महागाईने कंबरडे मोडले असताना सामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. आता नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. यामुळे आता सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांना याची अजूनच झळ बसणार आहे. आता सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे.
यामुळे खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. तसेच अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. यामध्ये आता पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते.
तसेच एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर केली आहे. यामुळे आता तुम्हाला आता जास्तीचे पैसे खिश्यात ठेवावे लागणार आहेत. तसेच सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे.
शेतकऱ्यांना कोट्यावधील गंडा घालणारा अटकेत! उकीरड्यात पुरुन ठेवलेले लाखो रुपये..
तसेच वेगवेळ्या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनो 'ही' टेक्निक वापरा आणि टॉमेटोमधून लाखो कमवा, जाणून घ्या...
जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यामुळे आरोग्यसेवा महागणार, शैक्षणिक वस्तू महागणार आहेत. यामुळे आता सरकारने दिलासा देण्याऐवजी महागाई अजूनच वाढवली आहे.
महत्वाच्या बातम्या;
आनंदाची बातमी! 13 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर, तब्बल 603 कोटींहून रक्कम जमा
Petrol Diesel Rates : आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार? पहा आजचे नवीन दर
देशात महागाई वाढणार! 18 जुलैपासून खिश्यात जास्तीचे पैसे ठेवा...
Published on: 17 July 2022, 05:04 IST