गेल्या काही दिवसांनंतर देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, अशा जीवनावश्यक वस्तूंमध्ये सतत वाढ होत आहे. असे असताना आता औषधांच्या किमती देखील वाढणार आहेत. यामुळे याचा परिणाम आता तुमच्या खिशावर होणार आहे. सरकारने शेड्यूल औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत देखील वाढ होणार आहे.
किरकोळ आजारी पडल्यानंतर जी आवश्यक औषधे घेण्यात येतात त्यात महागाई होणार असल्याने त्याचा फटका सामान्यांच्या बजेटवर बसणार आहे. रोजच्या वापरातली ही औषधे आहेत. यामध्ये पेन किलर आणि पॅरासिटामॉलसारख्या अँटीबायोटिक्स, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक औषधे महाग होऊ लागतील. पुढील महिन्यात हे दर लागू होणार आहेत.
मोदी सरकारने या दरवाढीला मान्यता दिली आहे. नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीकडून शेड्यूल्ड औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल प्रकारातील औषधांचा समावेश हा अत्यावश्यक औषधांमध्ये होतो. यावर सरकारचे नियंत्रण असते. भारतामध्ये शेड्यूल प्रकारात 800 पेक्षा अधिक औषधांचा समावेश आहे. यामुळे आता या भाववाढीत ८०० औषधांच्या किमती वाढणार आहेत.
औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोबतच मनुष्यबळाची किंमत देखील वाढली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढल्याने, पूर्वीच्या दरात औषधांची विक्री करणे परवडत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. ही दरवाढ ठोक खरेदी विक्रीच्या आधारावर करण्यात येणार आहे. मात्र तरी देखील या दरवाढीचा फटका हा किरकोळ खरेदीदारांना देखील बसणार आहे.
यामुळे आता सामान्य जनतेच्या खिशाला अधिकच फटका बसणार असून येणाऱ्या काळात यामुळे सरकारला याचा रोष सहन करावा लागेल, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, देशात अनेक गोष्टी महाग होत चालल्या आहेत. खाद्यतेल देखील महाग झाले आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे देखील अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिश्यावर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! PM kisan Yojna; पीएम किसान योजनेत मोठा बदल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
जमिनीची मशागत नांगरट कशी करायची, वाचा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा महत्वाचा सल्ला..
चाळीसगावमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Published on: 26 March 2022, 02:25 IST