News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीमागची संकटाची मालिका काही थांबताना दिसत नाही. यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनच्या पावसाने शेतकरी वर्गाला दिलासा तर मिळालाच मात्र मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता कुठेतरी पाऊस थांबतच पिकावर रोग पाडण्याचे सत्र सुरु झाले आहे.

Updated on 24 August, 2022 5:36 PM IST

महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीमागची संकटाची मालिका काही थांबताना दिसत नाही. यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) शेतकरी वर्गाला दिलासा तर मिळालाच मात्र मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता कुठेतरी पाऊस थांबतच पिकावर रोग (Crop disease) पाडण्याचे सत्र सुरु झाले आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) पिके पाण्याखाली गेली होती, तर आता दीड महिन्यानंतर हलका पाऊस पडत आहे. त्यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. तण काढणे, खुरपणी अशी शेतीची कामे संपवून पीक वाढविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत.

मात्र, शेतकऱ्यांची चिंता संपत नाही. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी पावसाच्या धोक्यापासून पीक वाचवले आहे. परंतु, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीपाचे मुख्य पीक असलेल्या कपाशीवर (Cotton) शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.

अशा परिस्थितीत खरीप पिकांची पावसाच्या संकटातून सुटका होऊनही उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. गतवर्षी कापसाच्या विक्रमी दरामुळे यंदा नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ३० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याची अपेक्षा होती, पण जसजशी पिके मोठी झाली, तसतशी संकटांची मालिका वाढत गेली, पिकांवर किडींचा हल्ला वाढला. आता उत्पादन कसे वाढणार, या चिंतेत सर्व शेतकरी आहेत.

धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

पाणी साचलेल्या भागातील पिकांवर बुरशीजन्य रोग

राज्यात १ जुलैपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरले होते. पिकांच्या भागात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाचा परिणाम पिकांवर झाला होता, मात्र आता बदलत्या वातावरणाचा परिणामही दिसून येत आहे.

सध्या खरीप पीक मध्यम अवस्थेत आहे. रोगराईचा असा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच उत्पादन धोक्यात आले असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शोषक कीटकांचा धोका

अनेक भागात साचलेल्या पाण्यामुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. आता कपाशीवर शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कपाशीची पाने लाल होऊन गळतात. मे महिन्यात पेरलेला कापूस पूर्ण बहरात आला आहे, कपाशीची फुले संसर्गामुळे मरत आहेत. शोषक किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची फवारणी करत आहेत.

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास...

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज आहे

हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, शोषक किडींच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात किंवा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन केल्यास त्याचा फायदा होईल.

याशिवाय खरिपातील पिके पाच महिन्यांची असतात. या दरम्यान, योग्य सल्ला घेतल्यासच फायदा होईल. त्यामुळे कृषी विभागाने अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या:
संकटांची मालिका संपेना! द्राक्ष लागवडीला कंटाळून शेतकऱ्याने १० एकर बागेवर फिरवला ट्रॅक्टर
Onion Price: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी! शेतकरी आक्रमक; सरकारकडे केली ही मागणी..

English Summary: infestation of sap-sucking insects on cotton
Published on: 24 August 2022, 05:36 IST