नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सारंगखेडा येथे दरवर्षी यात्रा निमित्ताने घोडेबाजार भरवला जातो, मात्र दोन वर्षांपासून कोरोना नामक महाभयंकर आजारांमुळे सारंखेडा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदाही सारंगखेडा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे मात्र कोरोना थोडा आटोक्यात आल्यामुळे घोडेबाजाराला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. सारंखेडा घोडेबाजारात कोट्यावधी रुपयांची अश्व दाखल होतात, आणि हे अश्व आकर्षणाचे केंद्र ठरतात. सारंखेडा घोडेबाजारात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, यंदादेखील कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. कालपासून सारंगखेडा घोडेबाजार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे, कारण की देशातील सर्वात मोठ्या घोडेबाजारात देशातील सर्वात महागडा अश्व दाखल झाला आहे.
हा अश्व एवढा महाग आहे की, यांच्या किमतीत रोल्स रॉयस देखील विकत देता येऊ शकते. सारंखेडा घोडा बाजारात अलबक्ष नावाच्या अश्वाची इंट्री झाली आहे, हा अश्व त्याच्या किमतीमुळे भारतात प्रसिद्ध आहे, अलबक्ष ची किंमत तब्बल अकरा कोटी रुपये आहे. शिवाय या घोड्याच्या खुराकासाठी महिन्याला लाखो रुपयांचा खर्च केला जातो. यावरून आपल्या लक्षात आले असेल कि हा कोणी साधा अश्व नसून एक विविआयपी अश्व आहे. या अश्वाला राहण्यासाठी एका विशिष्ट एसी गाडीची व्यवस्था देखील त्याच्या मालकाने करून ठेवली आहे, हा अश्व फक्त रायडिंग साठीच बाहेर निघतो. म्हणजे एकंदरीत अलबक्ष अश्वाची एखाद्या फिल्मस्टार सारखी लाईफस्टाईल आहे.
अलबक्ष अश्वाच्या मालकाचे नाव आर. पि. गिल. असे आहे ते पंजाब मधील लुधियाना चे रहिवासी आहेत. सारंखेडा मध्ये आत्तापर्यंत आलेल्या सर्व अश्वापैकी अलबक्ष अश्व सर्वात महागडा असल्याचे सांगितले जात आहे. याआधी 2019 मध्ये सारंगखेडा येथे शान नावाचा अश्व दाखल झाला होता त्याची किंमत तब्बल दहा कोटी एवढी होती त्याचा विक्रम अलबक्ष अश्वाने मोडला आहे. अलबक्ष अश्वाला महिन्याला खाण्यासाठी तब्बल एक लाख रुपये खर्च केला जातो. अलबक्ष अश्व पंजाब मध्ये झालेला एक अश्व स्पर्धेत चांगलाच चर्चेत आला होता आणि या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक देखील पटकावला होता.
अल्बक्ष हा चार वर्षाचा एक यंग घोडा आहे, याची उंची 80 इंच इतकी आहे. हा घोडा सारंगखेडा घोडेबाजारातील सर्वात उंच घोडा असल्याचे सांगितलं जात आहे. त्याच्या उंचीमुळे अल्बक्ष घोडेबाजारात प्रमुख आकर्षणाचे केंद्र बनला आहे. अल्बक्षच्या मालकाचे मते, अल्बक्षला राहण्यासाठी खास एसीची व्यवस्था केली आहे, त्याच्या सेवेसाठी सदैव दोन सेवेकरी तैनात केलेले असतात, अलबक्ष जेव्हा आपण त्याच्या ठिकाणाहून बाहेर येतो तेव्हा त्याची पूजा केली जाते. तसेच परत त्याच्या जागी जाताना देखील त्याची पूजा केली जाते व त्याची दृष्ट काढली जाते. अलबक्ष त्याच्या किमती मुळे तर चर्चेत राहतोच, तसेच तो आता त्याच्या राजेशाही थाटामूळे देखील एक चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा:- पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स, यामुळे होणार फायदाच फायदा, जाणुन घ्या सविस्तर
Published on: 25 December 2021, 09:54 IST