News

बांगलादेशने कांदा आयात करण्यास परवानगी दिली असून गेल्या तीन महिन्यापासून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा निर्यात करणे बंद होते. परंतु आता 2 जुलै 2022 पासून बांगलादेश मध्ये भारतीय कांदा निर्यात सुरळीतपणे सुरू होणार आहे.

Updated on 30 June, 2022 12:35 PM IST

 बांगलादेशने कांदा आयात करण्यास परवानगी दिली असून गेल्या तीन महिन्यापासून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा निर्यात करणे बंद होते. परंतु आता 2 जुलै 2022 पासून बांगलादेश मध्ये भारतीय कांदा निर्यात सुरळीतपणे सुरू होणार आहे.

ही निर्यात सुरू झाल्यानंतर येणाऱ्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात सकारात्मक परिणाम दिसू शकणार आहेत. या पुन्हा सुरू झालेल्या कांदा निर्यातीमुळे कांद्याचे बाजार भाव वाढण्यास मदत होणार

असून कांदा निर्यातीबाबत इतर देशांच्या तुलनेत भारतीय कांदा चवदार आणि टिकाऊ असल्याने भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असते. एकूणच निर्यात सुरू झाल्यामुळे कांदा दरात सुधारणा होऊन त्याचा लाभ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; 'या' देशाने भारतीय कांदा आयत करण्यासाठी दिली परवानगी

जास्तीत जास्त कांदा निर्यात होणे आवश्यक असून त्यासाठी निर्यात शुल्क दूर करणे तसेच निर्यातीत येणारे काही अडथळे देखील दूर करणे गरजेचे आहे

कांदा बाजार भावाच्या प्रश्नावरून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी वेळोवेळी सरकारकचे लक्ष वेधले होते.

त्याचा परिणाम आता कांदा निर्यात सुरु होण्यावर झाला असून भारतातून होणाऱ्या कांद्याचे निर्यात ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व समाधानाची बाब म्हणावी लागेल.

नक्की वाचा:औरंगाबाद नव्हे आता संभाजीनगर म्हणा…! मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण, वाचा मंत्रिमंडळातील 10 निर्णय

 बांगलादेश भारतीय कांद्याचा मोठा आयातदार

 भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत बांगलादेशचा मोठा वाटा आहे.

परंतु गेल्या तीन महिन्यापासून बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात रोखली होती. या कारणांमुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु आता ही आयात पुन्हा सुरू होत असल्याने कांद्याच्या दरात निश्‍चित वाढ होण्यास मदत होणार आहे.

बांगलादेशने आयात थांबल्यामुळे  तसेच भारतीय कांदा निर्यातदारांसाठी बांगलादेश एक मोठी बाजारपेठ असल्याने पुरवठा साखळी प्रभावित होत होती मात्र आता पुन्हा कांद्याचे दर सुधारतील अशी शक्यता आहे. एकूणच नाशिक जिल्ह्यातून बांगलादेश मध्ये सर्वाधिक कांद्याची निर्यात केली जाते.

नक्की वाचा:Uddhav Thackeray| उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, आता पुढे काय….

 

English Summary: indian onion export start to bangladesh from second july 2022
Published on: 30 June 2022, 12:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)