News

भारतातील आंब्यांना संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व दर्जाच्या दृष्टिकोनातून भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.

Updated on 13 June, 2022 6:31 PM IST

 भारतातील आंब्यांना संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व दर्जाच्या दृष्टिकोनातून भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.

भारतामध्ये विविध प्रकारचे आंब्यांच्या जाती असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व इतर देशांना निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते.

या निर्यातीमध्ये जर आपण विचार केला तरअमेरिकेत देखीलभारतीय आंबा मोठ्या प्रमाणात पाठवला जातो परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे भारतातून आंब्यांच्या आयातीवर निर्बंध लावले गेले होते.

रंतु आता अमेरिकेने भारतीय आंब्यांच्या आयातीस मंजुरी दिली असून राजस्थान राज्यातील रावतभाटा मध्ये बनणाऱ्या किरणोत्सर्ग स्त्रोताच्या मदतीने फूड रेडिएशन प्रक्रिया करून हे आंबे अमेरिकेला पाठवले जात आहेत.

राजस्थान राज्यातील रावतभाटा मध्ये बोर्ड ऑफ रेडिएशन  अँड आयसोटोप टेक्नॉलॉजीच्या कोबाल्ट फॅसिलिटी कोबाल्ट 60 किरणोत्सर्ग स्त्रोत बनतो.

नक्की वाचा:शेतकरी दादांनो : आंबा लागवडीसाठी या 'टीप्स' वापरा, होईल फायदा अन मिळेल भरघोस उत्पादन

हा स्त्रोत फूड ई रेडिएशन साठी फूड प्रोसेसिंग प्लांट ला उपलब्ध करून दिला जातो.

त्या ठिकाणी खाद्यपदार्थ बॅक्टेरिया, विविध प्रकारचे व्हायरस आणि कीटक रहित असतात. रावतभाटा येथून हे किरणोत्सर्ग स्त्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख यंत्रणाना उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, गुजरात मधील वापी आणि अहमदाबाद तसेच कर्नाटक मधील बेंगलोर येथील केंद्रांचा समावेश आहे. जर आपण कोरोना कालावधी च्या अगोदरचा म्हणजेच 2019 चा विचार केला तर अमेरिकेला 1095 टन आंबा निर्यात करण्यात आला होता.

आंबे विमानाने पाठवले जातात. यावर्षी ही प्रक्रिया करून जवळजवळ एक हजार शंभर टन म्हणजे 39 कोटी रुपयांचा आंबा अमेरिकेला पाठवला जाईल. अमेरिकेमध्ये भारतीय आंब्याला खूप पसंती असून सर्वाधिक किंमत मिळते.

नक्की वाचा:Corona Update: कोरोनाचा धोका वाढतोय? गेल्या 24 तासात देशात 6,065 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात यापैकी निम्मे रुग्ण

नक्की वाचा:फलोत्पादन विशेष: शहाबादी आंब्याला विदेशी पसंत,आमिर खानची आहे 200 बिघा आंब्याची बाग

English Summary: indian mando export in america with doing radiation technolgy for corona security
Published on: 13 June 2022, 06:31 IST