मागील वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. ब्राझील देशानंतर भारत हा सर्वाधिक साखर उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा भारताने साखर उत्पादनात ब्राझीललादेखील मागे टाकले आहे. भारत देशाने आता साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकवला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशला पीछाडीवर टाकत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा देशात साखरेचे उत्पादन हे सुमारे ३५७ लाख टन इतके झाले आहे.
त्यातील एकट्या महाराष्ट्रातून १३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे. देशातील महाराष्ट्रात साखरेचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे. ब्राझीलने यावेळेस साखर उत्पादन इथेनॉलकडे वळवले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची कमतरता भासू लागली. मात्र ही कमतरता भारताने आणि महाराष्ट्राने भरून काढली.
भारतामधून साधारण ९० लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रातून ५६ टक्के साखर निर्यात करण्यात आलेली आहे. भारत देश इथेनॉल उत्पादनातही आघाडीवर आहे. राज्याने जवळजवळ २०० कोटी लीटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता तयार केली आहे. शिवाय राज्यातील साखर कारखान्यांनी जवळजवळ ११२ कोटी लीटर इथेनॉलचे करार बऱ्याच ऑइल कंपन्यांबरोबरदेखील केले आहेत.
प्रशासनाने साखर उद्योगात घेतलेल्या कठोर निर्णयामुळे साखर उद्योगात शिस्त आली असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. गाळपाच्या परवानगीसाठी संपूर्ण एफआरपी देणे अनिवार्य केले, एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची टक्केनिहाय नावे जाहीर करण्यात आली,त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस कुठे टाकायचा याचा निर्णय घेणे सहजसोपे झाले. असे काही निर्णय फायद्याचे ठरले असे ते म्हणाले.
शेणामुळे झाला जबरदस्त फायदा; 'या' देशाकडून भारताला आली सर्वात मोठी मागणी
पुढे शेखर गायकवाड असेही म्हणाले, यंदा उसाची विक्रमी गाळप होऊनही कारखान्यांना इथेनॉलचे तसेच निर्यातीचे सहवीज निर्मितीचे पैसे वेळेत मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आतापर्यंत एफआरपीचे ९६ टक्के पैसे मिळाले असून आर्थिक दृष्टिकोनातून कारखाने व शेतकऱ्यांना यांचा गाळप फायद्याचा ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बापरे! नदीपात्रात आढळले वापरलेले कोरोना चाचणी कीट; दोषींवर कारवाईची मागणी
एकाच दिवशी,एकाच जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू; जिल्ह्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
Published on: 16 June 2022, 03:26 IST