News

जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत खरीप पिकाच्या अंदाजानुसार ही बंदी उठविल्यानंतर भारताने ८७००० टन कांद्याची निर्यात केली आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी संसदेत सांगितले.

Updated on 10 March, 2021 7:40 AM IST

जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत खरीप पिकाच्या अंदाजानुसार ही बंदी उठविल्यानंतर भारताने ८७००० टन कांद्याची निर्यात केली आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी संसदेत सांगितले.

खरीप आणि उशीरा खरीप उत्पादनाचा अंदाज लक्षात घेता सरकारने जानेवारीपासून निर्यातवरील बंदी उठविली, असे त्यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले.अलीकडील बंदी उठविल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ या महिन्यात कांद्याची निर्यात अनुक्रमे ५६००० टन आणि ३१००० टन झाली आहे, सप्टेंबर २०२० मध्ये बंदी लागू होण्यापूर्वी मासिक सरासरी २. १८ लाख टन निर्यात झाली होती असे तोमर म्हणाले.

हेही वाचा:शेती क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढविणार :केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर

२०१९-२० मध्ये २३२०.७० कोटींच्या किंमतीवर देशात 11.50 लाख टन कांद्याची निर्यात झाली.यावर्षी मार्चपासून रब्बी पिकाची खरेदी करून बांधण्यात येणाऱ्या किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत २०२०-२२ च्या दरम्यान सरकारने दोन लाख टन कांदा बफर तयार करण्यास मान्यता दिली असल्याचे मंत्री म्हणाले.

डिसेंबर २०२० मध्ये कांद्याचे भारतीय सरासरी किरकोळ दर ४४.३३ रुपये प्रतिकिलो होते, तर जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये हे दर अनुक्रमे ३८.५९रुपये आणि ४४.०८ रुपये प्रति किलो झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

English Summary: India exports 87,000 tonnes of onions in January-February: Agriculture Minister Narendra Singh Tomar
Published on: 10 March 2021, 07:40 IST