News

नवी दिल्ली : भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश आहे. देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

Updated on 30 October, 2022 9:00 AM IST

नवी दिल्ली : भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश आहे. देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे. केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध पुढील वर्षापर्यंत वाढवण्यात आले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे की, साखर निर्यात बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध टॅरिफ रेट कोटा अंतर्गत यूएस आणि युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीवर लागू होणार नाहीत.

हेही वाचा: आनंदाची बातमी: किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश आहे. भारतातून बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि दुबईसह अनेक देशांमध्ये साखरेची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. गेल्या वर्षी भारताने विक्रमी पातळीवर साखर निर्यात केली होती.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने अंदाज व्यक्त केला आहे की 2021-22 हंगामातील 3.4 दशलक्ष टन साखरेच्या तुलनेत 2022-23 हंगामात 4.5 दशलक्ष टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरली जाईल.

हेही वाचा: सोयाबीनच्या दरात चढ की उतार? पहा आज किती मिळाला दर ?

इथेनॉलमध्ये रूपांतर झाल्यानंतर 2022-23 हंगामात साखरेचे उत्पादन सुमारे 36.5 दशलक्ष टन अपेक्षित आहे, तर पुढील हंगामात सुमारे 27.5 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. अतिरिक्त 9 दशलक्ष टन निर्यात करणे आवश्यक आहे, असे उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी सांगितले आहे.

यंदा देशात विक्रमी उसाचे उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात 27.5 दशलक्ष टन साखरेचा देशांतर्गत वापर होण्याचा अंदाज आहे. देशात ऑक्टोबर ते सप्टेंबर हा साखर हंगाम मानला जातो.

2022-23 हंगामात भारताचे साखरेचे उत्पादन सुमारे 41 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. शिवाय 4.5 दशलक्ष टन इथेनॉल तयार करण्यासाठी वळवण्यात आले आहे जे चालू हंगामातील अंदाजे उत्पादनापेक्षा 1.8 दशलक्ष टन किंवा 4.6 टक्के अधिक असेल.

हेही वाचा: सर्वात मोठी बातमी! पोलिस भरतीला स्थगिती

English Summary: Increased export ban on sugar; central government has taken a decision
Published on: 30 October 2022, 09:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)