News

अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. असे असताना आता शेतकरी पुन्हा एकदा सावरत आहे. आता जळगाव जिल्ह्यात केळीला (Banana) उच्चांकी दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी आहे.

Updated on 23 December, 2022 3:28 PM IST

अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. असे असताना आता शेतकरी पुन्हा एकदा सावरत आहे. आता जळगाव जिल्ह्यात केळीला (Banana) उच्चांकी दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी आहे.

दर वर्षी हिवाळ्यात केळीच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं नेहमीच चित्र असते, अगदी उत्पादन खर्च ही यामध्ये निघेनासा असतो, मात्र यावर्षी यामध्ये बदल होताना दिसत आहे. एक नंबर निर्यातक्षम केळीला 2500 रुपये तर दोन नंबर केळीला 1500 ते 1800 इतका उच्चांकी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असे असताना केळीवरील वाढता उत्पादन खर्च पाहता आणि संकट पाहता असाच भाव वर्षभर मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे. काळी माती, उष्ण तापमान व शेणखताचा वापर यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची चव जगातील कोणत्याही केळीपेक्षा वेगळी आहे.

कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य

केळी हे मध्यम तापमानाच्या दमट हवामानाचे पीक म्हणून ओळखले जात असले तरी जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठी येणारी केळी कोरड्या हवामानात येते. मागील वर्षी याच काळात केळीचे दर तीनशे ते साडेतीनशे रुपये क्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याने मोठे नुकसान सोसावे लागले होते.

जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..

तापी खोर्यातील काळी माती व शेणखताचा होणारा वापर यामुळे या केळीला इतर ठिकाणच्या केळींपेक्षा जास्त गोडवा आहे आणि तोच या केळींचे आकर्षण वाढवणारा आहे. वाढलेल्या दरामुळे केळी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो सौर शेतीत मोठी संधी, केंद्र सरकारचे २५ हजार मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार, विमान प्रवासात घडला धक्कादायक प्रकार
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..

English Summary: increase price banana, farmers relieved getting high prices
Published on: 23 December 2022, 03:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)