News

ग्रामीण भागातील पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती मिळावी व त्या अनुषंगाने शेतकरी व पशुपालकांना आधुनिक दुग्धव्यवसाय करता यावा या उद्देशाने महापशुधन एक्स्पोच्या आयोजन करण्यात आले आहे.

Updated on 23 March, 2023 10:08 AM IST

ग्रामीण भागातील पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची तत्पर माहिती मिळावी व त्या अनुषंगाने शेतकरी व पशुपालकांना आधुनिक दुग्धव्यवसाय करता यावा या उद्देशाने महापशुधन एक्स्पोच्या आयोजन करण्यात आले आहे.

माहिती व तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्राचा तर विकास झालाच आहे परंतु, दुग्धव्यवसाय क्षेत्र ही यामध्ये मागे राहू नये. यासाठी धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने शेतकरी व पशुपालकांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन भारतीय व अमेरिकन तज्ञांच्या सहाय्याने धेनू ॲप विकसित केले आहे या धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

आजकाल नोकरीचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे कित्तेक सुशिक्षित बेरोजगार तरुण हे दुग्धव्यवसायाकडे वळालेले आहेत. या सुशिक्षित तरुणांना दुग्धव्यवसायातील योग्य दिशा देण्याचे काम धेनू ॲप करत आहे.

जाणून घ्या काय आहेत? धेनू ॲपची खास वैशिष्ट्ये-

धेनू ॲप हे वापरण्यास अगदी सहज व सोपे असल्याने ते खास करून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतही उपलब्ध आहे.

धेनू ॲपने शेतकरी व पशुपालकांच्या गरजा लक्षात घेऊन मंच प्रश्न-उत्तरे, धेनू वार्ता, पशु बाजार, पशु ज्ञान, धेनू एक्स्पर्ट, धेनू दूत, पशु व्यवस्थापन, ट्रेनिंग सेंटर, पशु स्पर्धा, ताज्या घडामोडी, पशु सल्ला, रेफर एंड अर्न, बिझनेस पेज, प्रेरणादायी यशोगाथा, प्रतिसाद अहवाल इत्यादी विभाग हे कृषी व्यावसायिक व पशुपालकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहेत.

गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....

महाराष्ट्रासह इतर राज्यातील पशुपालक देखील दुग्धव्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी धेनू ॲपचा पुरेपूर वापर करत आहेत

धेनू ॲपमध्ये डेअरी फार्मसाठी लागणाऱ्या निविष्ठा, मशीनरी व एकाच क्लिकवर उपलब्ध होत असल्याने हे एक आधुनिक तंत्रज्ञानाचे डिजिटल दालन बनले आहे.

धेनू ॲपद्वारे वर्षभर विविध पशु स्पर्धा, मेळावे, इत्यादी उपक्रमांचे, महिला सशक्तिकरणाच्या योजनांचे आयोजन केले जाते.

धेनू ॲपच्या पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची पशुपालकांना तत्पर माहिती मिळते. त्यामुळे खूप शेतकरी हुशार व जिज्ञासू झालेले आहेत.

धेनू ॲप हे पशुपालकांना दुग्धव्यवसायातील सर्व सेवा व सुविधा पशुपालकांना मोफत उपलब्ध करून देत असल्याने शेतकऱ्यांचा येण्याचा व प्रशिक्षण घेण्याचा लाखोंचा खर्च कमी झाला आहे.

धेनू ॲप हे प्ले स्टोअरवरती मोफत उपलब्ध करून दिल्याने दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार तर झालाच परंतु कित्येक शेतकऱ्यांनी पारंपारिक दुग्ध व्यवसायाला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे.

दुग्धव्यवसाय हा खूप खर्चिक, वेळखाऊ आणि संयमी धंदा असल्याने त्यामध्ये एक जरी चुकीचे पाऊल पडले तरी दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची जास्त भीती असते, त्यामुळे या व्यवसायातून आपणाला तोटा होऊच नये यासाठी पशुपालक धेनव्याप वरती जनावरांची नोंद करतात आणि धेनू ॲपने दिलेल्या व्यवस्थापनाच्या अधिसूचनेनुसार आपल्या गोठ्याचे योग्य रीतीने नियोजन करतात त्यामुळे धेनू ॲप हा तरुण पशुपालकांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे.

शेतकऱ्याने काढले एकरी १३३ टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसे..

पशुपालन व दुग्धव्यवसाया संबंधित अधिक माहिती व तंत्रज्ञानासाठी आजच प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाऊनलोड करा.
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX

लेखक
श्री.नितीन रा. पिसाळ
प्रकल्प समन्वयक, धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी, पुणे
मो.बा. 8007313597

ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
पुसा कृषी प्रदर्शनात धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्ष
अवकाळी पावसाने नुकसान, पण राज्यांनी अहवाल पाठवले नाहीत: केंद्र सरकारची माहिती

English Summary: In Shirdi's Mahapashudhan Expo, cattle breeders will get the modern technology of Dhenu App...
Published on: 23 March 2023, 10:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)