News

सासवड येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होते. येथे ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६३११ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

Updated on 29 July, 2023 9:37 AM IST

सासवड येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होते. येथे ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६३११ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

दिवे, सोनोरी, शिवरी यांसह संपूर्ण पुरंदर, बारामती आणि फलटण भाग अशा विविध भागांतून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. येथून पुण्यासह विविध भागांत धान्य विक्रीसाठी जाते.

वाघेश्‍वरी माता ट्रेडिंग कंपनीच्या ठिकाणी एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल ६३११ रुपये, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान ४ हजार रुपये, तर सरासरी ५ हजार १५५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

टोमॅटोने भारताला रडवले, आता तांदूळ जगाला रडवणार! कारण काय जाणून घ्या..

माहिती बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांनी दिली. सध्या येथील आवक काही प्रमाणात कमीअधिक होत आहे. त्यामुळे बाजारात चढ-उतार होतात. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटी रुपये रक्कम वितरित

नीरा ही बाजार समिती गुळासाठी प्रसिद्ध आहे. तर सासवड येथील उपबाजार समिती ही धान्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात.

या फुलाची लागवड करून शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या कशी केली जाते लागवड
गायीच्या दुधाला 34 रुपयांचा दर ही फसवी दरवाढ, दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी; शेतकऱ्यांनी केले आंदोलन
पिकविम्याच्या मदतीसाठी आता 92 तास मुदत करणार, केंद्राकडे पाठपुरावा करणार, कृषीमंत्र्यांची माहिती

English Summary: In Saswad, sorghum prices hit a high of Rs 6311, relief to farmers...
Published on: 29 July 2023, 09:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)