News

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रेटवडी गावात काळे कुटूंबासोबत मागील २२ वर्षांपासून त्यांचा नंदया बैल राहत होता मात्र काही दिवसांपूर्वी नंदया बैलाचे निधन झाले त्यामुळे काळे कुटुंबाने एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. जे की गेली अनेक वर्षे नंदया आपल्या जवळ होता त्यामुळे त्याची कृतज्ञता व्यक्त करताना काळे कुटुंबाच्या डोळ्यातून पाणी राहत नाही. ज्याप्रमाणे व्यक्तीचा मृत्यू झाला तर जशी दशक्रिया घालतात किंवा तेरावा विधी त्याचप्रमाणे काळे कुटुंबाने सुद्धा नंदया चा मृत्यूनंतर दशक्रिया तसेच तेरावा विधी घातला.

Updated on 27 August, 2021 7:56 PM IST

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रेटवडी गावात काळे कुटूंबासोबत मागील २२ वर्षांपासून त्यांचा नंदया बैल राहत होता मात्र काही दिवसांपूर्वी नंदया बैलाचे निधन झाले त्यामुळे काळे कुटुंबाने एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. जे की गेली अनेक वर्षे नंदया आपल्या जवळ होता त्यामुळे त्याची कृतज्ञता व्यक्त करताना काळे कुटुंबाच्या डोळ्यातून पाणी राहत नाही.ज्याप्रमाणे व्यक्तीचा मृत्यू झाला तर जशी दशक्रिया घालतात किंवा तेरावा विधी त्याचप्रमाणे काळे कुटुंबाने सुद्धा नंदया चा मृत्यूनंतर दशक्रिया तसेच तेरावा विधी घातला.

4 महिन्याचं वासरु ते 22 वर्षांचा सहवासाचा प्रवास:

या कोरोनाच्या महामारी संकटात अनेक लोकांचे मृत्यू झाले मात्र अंत्यविधी झाला नाही म्हणून घरच्यांनी मृतदेह सुद्धा घेण्यास टाळल.मात्र या शेतकऱ्याने त्याचा नंदया बैलाचा शेवट गोड केला आहे जे की त्याने एवढे कष्ट केले आणि त्याचा जो प्रवास होता त्याची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अगदी ४ महिन्याचे वासरू असता पासून २२ वर्षापर्यंतचा नंदया बैलाचा प्रवास  म्हणजेच काळे कुटुंबाचा एक भागच.

हेही वाचा:एकमेकांवर टीका करण्यापेक्षा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या, किसान सभा

गोडधोड जेवणाची पंगत घालत तेराव्याचा धार्मिक कार्यक्रम:-

त्यांच्या लाडका नंदया बैल काळे कुटुंबापासून कायमचा दूर गेला आहे, जे की या नंदया बैलाची कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. मृत्यू नंतर  ज्या  प्रमाणे माणसाची विधी केली जाते फ्याच प्रमाणे काळे कुटुंबीयांनी सुद्धा नंदया ची विधी केली आहे. अगदी गावातील लोकांना तसेच त्यांच्या नातेवाईक लोकांना सुद्धा गोड जेवण करून पंगत मध्ये वाढलेलं आहे अशा प्रकारे तेरावा चा धार्मिक कार्यक्रम पार पाडला.

गोठ्यातील बैलाची जागा रिकामीच:-

खेड तालुक्यातील रेटवडी गावात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव शिवराम काळे असे आहे. जवळपास नंदया ने काळे कुटुंब सोबत २२ वर्ष काबाड कष्ट केले मात्र तो गेल्यापासून गोठ्यातील जागा रिकामीच राहिलेली आहे.माणूस गेल्यावर जेवढा दुःख एखाद्या व्यक्तीला होत नाही तेवढं दुःख नंदयाचे सहकारी जे बैल होते त्यांना झाले आहे. एकीकडे राज्यात बैलगाडी शर्यत सुरू व्हावी म्हणून शेतकरी वर्ग आक्रमक झालेला आहे तर दुसरीकडे काळे कुटुंब आपल्या मुलाचा जसा सांभाळ करतात त्याप्रमाणे नंदया चा सांभाळ करताना दिसत आहे.

English Summary: In Pune, after the death of a bull, a farmer performed the funeral rites like a human being
Published on: 27 August 2021, 07:54 IST