कांदा म्हटले म्हणजे सगळ्या प्रकारच्या शेत पिकांमधील बाजार भावाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वेगळे पीक आहे. कांदा शेतकऱ्यांनाकधी कधी अपेक्षेपेक्षा जास्त देऊन जातो.
नाहीतर कधीकधी जे शेतकऱ्यांकडे आहे तेसुद्धा हिरावून नेतो. त्याचं प्रत्यंतर सध्या येत आहे. बाजारपेठेमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत असून यामधून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच परंतु वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल होत आहे. त्यामुळे कधी कधी हसवणाऱ्या कांद्याने शेतकर्यांना आता रडवले आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीत एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. त्याबाबत या लेखात माहिती घेऊ.
काय आहे नेमकं हे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी भावासाठी आंदोलन देखील केली. गोल्टी कांद्याला चांगला भाव मिळतो. परंतु याच गोल्टी कांद्याला केवळ पन्नास रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज तर सोडाच परंतु खिशातून पैसे टाकून कांदा बाजारपेठेत विकावे लागत आहे.
इतके असून सुद्धा व्यापाऱ्यांनी गोल्टी कांदा कडेपाठ फिरवली असल्यामुळे शेतकऱ्यांचे हतबलता वाढीस लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मनमाड बाजारपेठेतील फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र केले आणि त्यांच्याकडील कांदा निर्यात करण्याचे ठरवले.
स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत नसलातरी वियतनाम सोबत अन्य काही देशांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू शकेल याच उद्देशानेहा कांदा कंटेनर भरून पाठवला जात आहे.ज्या शेतकऱ्यांना लगेच पैशांची गरज आहे अशा शेतकऱ्यांना लगेच त्यांच्या कांद्याचा पैसा देखील देण्यात येत आहे. परंतु जे शेतकरी थोडा वेळ थांबू शकतात अशांना व्हीएतनाम येथे जो भाव मिळेल त्याप्रमाणे पैसे देण्यात येतील असे सांगण्यात आले.
गोल्टी कांदा स्थानिक व्यापारी एक ते दोन रुपये किलोने मागत आहेत परंतु व्हीएतनाम येथे कांद्याला 20 रुपये प्रति किलो दर मिळणार असला तरी खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात सात ते आठ रुपये एका किलोमागे पडणार आहेत.
या घटनेवरून एक शिकण्यासारखे गोष्ट आहे ती म्हणजे, जर शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत स्वताच मार्केट हातामध्ये घेतले तर काय होऊ शकते? हे सगळ्यांना दिसून आले असून आता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची भूमिका घ्यावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नक्की वाचा:महिला शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे? कृषिमंत्री दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य
Published on: 27 May 2022, 02:08 IST