सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस बरसत असून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.महाराष्ट्र मध्ये अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे.
त्यामुळे या हंगामातील शेतीला आणि पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली असे वातावरण आहे.अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यात देखील असून नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्टा
आणि जिल्ह्यातील महत्वाचे असलेल्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.एका दिवसाच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील बरीच धरणे तुडुंब भरले आहेत.
नक्की वाचा:IMD Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ! 'या' भागात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्रंबकेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम असून धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ सातत्याने होत आहे. त्यामुळे पालखेड आणि नांदूर-मध्यमेश्वर सारख्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
काही धरणे 50 टक्क्यांच्या वर गेली असून नाशिक जिल्ह्यातील दारणा,गंगापूर,पालखेड,कडवा,करंजवण,ओझरखेड आणि पुणेगाव इत्यादी धरणातील पाणीसाठ्यात जलद गतीने वाढ झाली आहे.
नक्की वाचा:सल्ला तज्ञांचा! पेरणी करण्याअगोदर वाचा 'हा' तज्ञांचा सल्ला,वाचेल दुबार पेरणीचे संकट
धरणांमधून विसर्ग
जिल्ह्यातील संततधार पावसामुळे इगतपुरी व दिंडोरी तालुक्यामध्ये आज धरणाच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने वाढ होत असल्याने पुराचा धोका वाढायला नको म्हणून महत्वाच्या धरणांमधून विसर्ग करण्यात येत
असून दारणा धरणातून 15572 क्यूसेक, पालखेड धरणातून 17530 क्युसेक, गंगापूर धरणातून 10035 क्युसेक, नांदूर मध्यमेश्वर धरणातून 69 हजार 562 क्युसेक आणि चणकापूर धरणातून 23 हजार 665 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Published on: 13 July 2022, 11:21 IST