विदर्भातील भंडारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड होतं असल्याची बघायला मिळत होती. भंडारा जिल्ह्यातून उन्हाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात कलिंगड विक्रीसाठी बाजारात येत असे. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्याने जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणावर नदीचे पात्र लाभले आहे त्यामुळे या नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कलिंगडची लागवड होत असते.
वैनगंगा नदीला बारामाही पाणी राहत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई भासत नाही त्यामुळे कलिंगडची लागवड करण्याकडे गेल्या सात वर्षापासून येथील शेतकऱ्यांचा कायमच कल राहिला आहे. कलिंगड या हंगामी पिकात जिल्ह्याची गेल्या अर्ध्या दशकापासून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. असे असले तरी मात्र कोरोना मुळे या जिल्ह्याची कलिंगड पिकासाठी असलेली ओळख मिटते की काय याबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे.
हेही वाचा:-खरं काय! वावरात मिळाले सोन्याचे कॉइन; 28 हजाराला विकला गेला एक शिक्का; पण.....
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कोरोना काळात गेली दोन वर्ष जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे कलिंगड बाजारात विक्रीसाठी जाऊ शकले नाही यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे गेली दोन वर्षे कलिंगड विक्रीसाठी अनेक अडथळे येत होते.
लॉकडाऊन असल्यामुळे कलिंगड साठी खरेदीदार मिळत नव्हते, यामुळे शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचे सांगितले गेले. यावर्षी राज्यात कोरोना बघायला मिळाला नाही परंतु मध्यंतरी कोरोनाची तिसरी लाट डोकावत असल्याने शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षां सारखी परिस्थिती पुन्हा आपल्यावर ओढावू नये याचा विचार करून कलिंगडची लागवड केळीच नाही. कलिंगडची लागवड जिल्ह्यात कमी झाल्याने जो जिल्हा आधी कलिंगडची निर्यात करत असे त्याच जिल्ह्याला आता वाढीव दराने कलिंगड खरेदी करावे लागत आहेत.
हेही वाचा:-काय सांगता! ATM मशीन मधून आता दिले जाणार रेशन; वाचा याविषयी सविस्तर
जिल्ह्यात कलिंगडची लागवड कमी झाल्याने कलिंगड ची मागणी पूर्ण होत नसून आता कलिंगडच्या दरात मोठी वाढ झाली आहे. साधारणपणे 20 रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे कलिंगड सध्या बाजारात 80 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळे कलिंगड खरेदीसाठी खरेदीदार मिळत नव्हते ज्या शेतकऱ्यांना खरेदीदार मिळाले त्यांनी अगदी कवडीमोल दरात कलिंगड विक्री केले यामुळे त्यावेळी कलिंगड पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले होते.
दोन वर्षांच्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी जर तशी परिस्थिती ओढावली तर काय करायचे म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड लागवडीकडे पाठ फिरवली. यामुळे जिल्ह्यात कलिंगड शॉर्टज निर्माण झाले आहे. तज्ञांच्या मते, भंडारा जिल्हा प्रमाणेच राज्यातील अनेक जिल्ह्यात कलिंगड पिकाबाबत काहीशी अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे त्यामुळे मागणीनुसार पुरवठा न झाल्यास भविष्यात कलिंगडचे दर कायम टिकून राहतील.
संबंधित बातम्या:-
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई 15 टक्क्यांनी वाढणार; स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची चिन्हे
….. जर या पद्धतीने बाष्पीभवन होत राहिले तर जायकवाडी धरण होईल रिकामं; मराठवाड्यासाठी चिंतेची बाब
Published on: 22 March 2022, 10:05 IST