सध्या सोयाबीनची आवक हळूहळू वाढत असताना दिसत आहे. त्याचबरोबर सोयाबीन (soyabean) बाजारभावात देखील वाढ होत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या मिळत असलेले सोयबीनचे बाजारभाव जाणून घेऊया.
आपण पाहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या (International Soybean Market) दरात काहीशी सुधारणा झाली होती. राज्यात मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकरी चिंतामुक्त झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला वेग दिला आहे.
महत्वाचे म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि इतर इतर सोयाबीन (soyabean) उत्पादक भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने पिकाची गुणवत्ता कमी झाली. त्यामुळे शेतकरी मळणी करून लगेच सोयाबीन विक्रीला प्राधान्य देताना दिसत आहेत. चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन शेतकरी मागे ठेवत आहेत.
दिलासादायक! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन
सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने या मालाला प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र आता विक्रीला येत असलेल्या सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. त्यामुळे बाजारातील किमान दरही काहीसे सुधारलेले दिसतात.
शेतकऱ्यांनो पीक नुकसानीबाबत माहिती भरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
देशातील बाजारात सोयाबीनचा किमान दर काहीसा वाढला आहे. तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय.
सध्याची मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांना 'हे' महत्वाचे तणनाशक फवारता येणार नाही; सरकारने घातली बंदी
'या' महिन्याचे शेवटचे दिवस तुमच्यासाठी कसे असतील? जाणून संपूर्ण राशीभविष्य
तुषार सिंचनाचा वापर करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी; कमी जागेत मिळेल भरघोस उत्पादन
Published on: 28 October 2022, 10:38 IST