यंदाच्या वर्षी देशाच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे जे की या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेले पीक सुद्धा निघून गेले आहे. यंदा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. मात्र शेतकऱ्यानं चिंता करण्याचे कोणतेही काम नाही. कारण सरकारची ही योजना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई करून देणार आहे. जे की ही योजना शेतकऱ्यानं माहीत देखील आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री फसला बिमा योजना असे आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करणे गरजेचे आहे जे की आशा शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई भेटणार आहे.
नैसर्गिक आपत्ती असेल तर भेटणार नुकसानभरपाई :-
पंतप्रधान फसल बिमा योजना अंतर्गत अवर्षण, अवकाळी पाऊस, बेमौसमी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे आलेला पूर या अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. जे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल बिमा योजनेत नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. नैसर्गिकरित्या आपत्तीमुळे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई भेटते. आताच्या स्थिती पर्यंत जवळपास ३६ कोटी शेतकऱ्यांना या पंतप्रधान फसल बिमा योजनेचा लाभ मिळालेला आहे.
हेही वाचा:-जाणून घ्या लिंबाचे लोणचे खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास.
शेतकऱ्यांना करावे लागणार अर्ज :-
देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागतो. अर्ज भरण्याच्या दोन पद्धती आहेत जे की एक ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाईन. जर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यांना या योजनेच्या https://pmfby.gov.in वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल. जे की या वेबसाईटवर सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर ज्या शेतकऱ्यांना ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यांनी जवळची बँक, सहकारी बँक तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे. या योजनेत सहभागी होयच असेल तर पेरणी करण्याआधी १० दिवस तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे :-
नैसर्गिकरित्या आपत्तीमुळे जर पिकांचे नुकसान झाले तर कंपनीला ७२ तास कालावधीमध्ये कळवावे लागेल. या ७२ तास कालावधीच्या काळात विमा कंपनीला कळवावे लागेल. पंचनामे झाले की त्यानंतर नुकसानीचा अंदाजित आकडा नोंदवण्यात येतो जे की पिकांचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज लावण्यात येतो. नुकसानभरपाई ची रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा होते. तुम्हाला या योजनेत सहभागी होयच असेल तर त्यासाठी राशन कार्ड, बँक खाते, आधार क्रमांक, पासपोर्ट फोटो, शेतीचा खासरा क्रमांक, रहिवाशी दाखला(वाहन परवाना, मतदान ओळखपत्र), इत्यादी सर्व प्रकारची कागदपत्रे महत्वाची आहे.
Published on: 19 September 2022, 03:51 IST