News

सध्याच्या काळात आधार कार्ड सर्वांसाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधारशिवाय तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकत नाही. घरातील कामापासून ते सरकारी कामापर्यंत आधारची गरज लागते.

Updated on 07 August, 2022 10:58 AM IST

सध्याच्या काळात आधार कार्ड सर्वांसाठी आवश्यक कागदपत्र (documents) बनले आहे. आधारशिवाय तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकत नाही. घरातील कामापासून ते सरकारी कामापर्यंत आधारची गरज लागते.

त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला आधारशी संबंधित काही समस्या असल्यास UIDAI कडून एक विशेष क्रमांक जारी करण्यात आला आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAI ने एक विशेष क्रमांक जारी केला आहे, ज्यावर तुम्ही २४ तासांत कधीही कॉल करू शकता आणि तुमची समस्या सोडवू शकता.

Cotton Crop: कापूस पिकावर 'या' किडींचा प्रादुर्भाव; त्वरित करा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान

आधारशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्हाला फक्त 1947 वर कॉल करावा लागेल आणि तुमच्या सर्व समस्या सहज सुटतील. हा नंबर जवळपास 12 भाषांमध्ये काम करतो, त्यामुळे कोणत्याही राज्यातील लोक या नंबरवर कॉल करून संपर्क करू शकतात.

हा नंबर डायल करून तुम्ही हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दूमध्ये बोलू शकता. #Dial1947ForAadhaar वर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता.

Mixed Fisheries: मिश्र मत्स्यपालन तंत्राचा लावला शोध; शेतकरी यातून घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न, जाणून घ्या..

हा नंबर पूर्णपणे मोफत आहे. म्हणजेच या नंबरवर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासोबतच तुम्ही या नंबरवर IVRS मोडवर २४ तासांत कधीही कॉल करू शकता.

या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी ७ ते रात्री ११ (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रतिनिधी उपलब्ध असतात.

महत्वाच्या बातम्या 
Electric Tractor: शेतकरी मित्रांनो देशात लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; 'या' कंपनीने केली घोषणा
Daily Horoscope: 'या' राशीच्या लोकांचे पुढचे काही दिवस संकटाचे; जाणून घ्या राशिभविष्य
शेतकऱ्यांना 'ही' शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; कमी गुंतवणुकीत घेतायत लाखोंची कमाई

English Summary: Important information provided UIDAI Aadhaar holders Profits Few Minutes
Published on: 07 August 2022, 10:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)