आयआयटी कानपूर ने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयआयटी कानपूर येथील स्टार्टअप इंक्युबॅशन आणि एनोवेशन सेंटर, तंत्रज्ञान व्यवसाय इन्क्युबेटर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात द्वारे समर्थीत मॅन्युफॅक्चरिंग एक्सीलरेटर कार्यक्रम सुरू करत आहे.
विजेत्या स्टार्टअपला दहा लाखांचे बक्षीस
या कार्यक्रमांतर्गत एकूण 15 स्टार्टअपची निवड केली जाणार आहे. त्यांना त्यांच्या उत्पादनाचा प्रयोग शाळा ते बाजारपेठेपर्यंतचा प्रवास गतिमान करण्याची संधी दिली जाईल. पंधरा स्टार्टअप च्या गटातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टार्टअपला दहा लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिक मिळेल.
या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी कृषी जागरण शी बोलताना प्रोफेसर इन्चार्ज इनोव्हेशन आणि इंक्युबॅशन, आयआयआयटी कानपूरचे प्रोफेसर अमिताभ बंदोपाध्याय म्हणाले, "आपला देश उत्पादन क्षेत्रात प्रचंड आव्हानांना तोंड देत आहे.
नक्की वाचा:मुरघास दुग्ध व्यवसायासाठी एक वरदान कृषि मित्रांनी सांगितले याचे महत्त्व
आम्हाला आरोग्य सेवा आणि कृषी क्षेत्रात काम करणार्या नवोदितांचे आणि स्टार्टअपची नितांत गरज आहे. त्यामुळे भारतातील उत्पादन क्षेत्र उंचावण्यासाठी काही वाजवी विकासात्मक आव्हानांना तोंड द्यावे लागेल
" पुढे बोलताना ते म्हणाले की, " माझा विश्वास आहे की निर्माण एक्सेलरेटर कार्यक्रम क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपचा फायदा घेण्याच्या आणि भांडवल उभारण्याची प्रचंड क्षमता आहे.
यात अर्ज करण्यासाठी आम्ही नवोदितांचे आणि स्टार्टअप्सचे स्वागत करतो" पुरस्कार निवडीच्या निकषांत बद्दल विचारले असता ते म्हणाले, " हे सर्व तुम्ही कोणत्या प्रकारचे उत्पादन स्टार्टअप आहात आणि तुम्हाला किती समर्थनाची आवश्यकता आहे यावर अवलंबून आहे.
निवड करताना तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेची व्यवहार्यता तसेच सेवेची गुणवत्ता विचारात घेतली जाईल. निवडलेल्या स्टार्टअप्सना कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पन्नास लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देखील मिळेल.
निखिल अग्रवाल, सीईओ, फौंडेशन फोर इंनोवेशन अंड रिसर्च इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि AIIDE म्हणाले, SIIC कडे आशादायक नवोन्मेषक आणि स्टार्टअप सोबत काम करण्याचा विपुल अनुभव आहे. जे सर्वोत्तम सामाजिक प्रभावाचा लाभ घेऊ शकता.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सोबतच्या या सहकार्याचा उद्देश देशातील उत्पादन क्षेत्राला पुनर्जिवित करण्याचा आहे. मला खात्री आहे की, हा कार्यक्रम कल्पकांना SaaS,AI/MLसारख्याच उत्कटतेने आणि उत्साहाने निर्मितीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.
मी अधिकाधिक स्टार्टअप्सला अर्ज करण्याचे आवाहन करतो. यामध्ये सहा महिन्याच्या दिर्घ कार्यक्रमाची रचना चार विभागांमध्ये केली जाईल. उत्पादन विकासाची तत्वे, अभियांत्रिकी प्रवेग, अनुपालन कोडे नेविगेट करणे आणि विकासाच्या पुढील टप्प्यावर नेणे.
हा कार्यक्रम नॉलेज वर्कशॉप, वन ऑन वन मार्गदर्शन सपोर्ट,क्लीनिकल व्हॅलिडेशन आणि बिझनेस, इन्वेस्टर कनेक्टसाठी कस्टमाइज्ड सपोर्ट साठी डीप डायविंग ऑफर करेल. या कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Published on: 27 July 2022, 02:25 IST