News

मुंबई: राज्यात शिवसेनेतील शिंदे गटाने बंडखोरी करत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये टिकासत्र सुरु आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत प्रश्न विचारला आहे.

Updated on 03 September, 2022 1:58 PM IST

मुंबई: राज्यात शिवसेनेतील (Shivsena) शिंदे गटाने बंडखोरी करत भाजप (BJP) बरोबर सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये टिकासत्र सुरु आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत प्रश्न विचारला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रश्न विचारत लिहले आहे की, “आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का?” असे शेलार यांनी लिहले आहे. आशिष शेलार यांनी हे पत्र ट्विट (Tweet) देखील केले आहे.

येत्या काळात महानगरपालिका निवडणूक होणार आहेत. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहे.

मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार...

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, कृपया,हे लक्षात असू द्या! “मा. श्री.उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला “बाई” म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे.

त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत!,आपला आ. अॅड. आशिष शेलार” असे या पत्रामध्ये लिहलं आहे.

भाजपचे नेते येतील अन् बारामतीचा विकास पाहून जातील; जयंत पाटलांचा भाजपला खोचक टोला

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. तसेच भाजपचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आहेत. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

महत्वाच्या बातम्या:
Electric Car: महिंद्राची जबरदस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही कार या महिन्यात होणार लॉन्च; सिंगल चार्जमध्ये 400 किमी धावणार
छोट्या गुंतवणुकीत 22 लाखांपर्यंत परतावा, LIC ची नवी योजना; जाणून घ्या सविस्तर...

English Summary: If you call our lotus lady, rest of your party should be called penguin army?
Published on: 03 September 2022, 01:58 IST