पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे उसाची लवकर येणारी वाण घ्या. आडसाली ऊस केला तर ३० टनाचे उत्पादन ५५ टनावर निश्चित जाईल. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज, असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात हेक्टरी २५० टन ऊस पिकविणारे शेतकरी आहेत.
त्यांना जमत मग इतर भागातील शेतकऱ्यांना का जमत नाही. कारखान्याचे व्यवस्थापन साखर, बग्यास, इथेनॉल, स्पिरीट, अल्कोहोल बायो सीएनजी आधी प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा देईल याचा विचार करते आहे.
मग ऊस उत्पादकांनीही कारखान्याच्या गरजेनुसार उत्पादनाची पद्धत अवलंबायला हवी, असेही पवार म्हणाले. सागर सहकारी कारखान्याच्या ६० हजार लिटर प्रति प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात गहू काढणीला वेग, पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा कष्टमय प्रवास...
यावेळी माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडित, जयप्रकाश दांडेगावकर, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, माजी आमदार संजय वाघचौरे, अरविंद चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे, डॉ. निसार देशमुख, सूरज चव्हाण, बबलू चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कारल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला भाव, शेतकऱ्याला मिळताहेत लाखो रुपये..
अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्यातील जैताळवाडीच्या कांदा उत्पादकाला पदरचे पैसे घालून शेतमाल विकावा लागतो. यापेक्षा दुर्दैव ते काय. असेही अजित पवार म्हणाले. यावेळी ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान’ या राज्य शासनाच्या जाहिरातीतीवर देखील टीका केली.
गुलाबी बटाट्याच्या शेतीत आश्चर्यकारक नफा, अवघ्या 80 दिवसांत शेतकरी होणार श्रीमंत!
'२ वर्षात राज्यात २२ जिल्हयात १०२५८ मुकादमांकडून ४४६ कोटींची वाहतूकदारांची फसवणूक'|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 12 कोटींचा रेडा पाहण्याचा मोह! शेतकऱ्यांचे केले कौतुक..
Published on: 27 March 2023, 04:04 IST