News

सध्या शहरात गार्डनिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यातून अनेक जण पैसादेखील कमावत आहेत. गार्डनिंग करुन तुम्ही आता चक्क स्ट्रॉबेरीचे भरपूर उत्पादन घेऊन मोठा नफा कमवू शकतात.

Updated on 05 November, 2020 5:29 PM IST


सध्या शहरात गार्डनिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यातून अनेक जण पैसादेखील कमावत आहेत. गार्डनिंग करुन तुम्ही आता चक्क स्ट्रॉबेरीचे भरपूर उत्पादन घेऊन मोठा नफा कमवू शकतात. हो, अगदी खरं अशी कामगिरी उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्यांनी केली आहे आणि बक्कळ पैसा देखील कमावला आहे. बरेली येथे राहणारे सौरभ सिंह यांनी आपल्या हजार वर्ग चौरस मीटर असलेल्या प्लॉटवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि पहिल्याच उत्पादनात त्यांना १२ लाख रुपयांचे उत्पादनही मिळाले.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणारी दुसरे उत्पादन १२  ते १४ लाख रुपयांपर्यंतची कमाई करून देईल. सौरभ यांनी या प्लॉटवर जास्तीत जास्त चार लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे, जी त्यांना पूर्ण पाच वर्षांपर्यंत अशा पद्धतीने भरपूर नफा देत राहील. एनसीआरमध्ये जॉब करणारे सौरभ यांनी आय आयटी दिल्ली मधून एमटेक (M.Tech) केले आहे. त्यांना आणि त्यांची पत्नी ऋचा यांना गार्डनिंगचा छंद आहे.  दोन वर्षा आधी त्यांनी इंटरनेटवर याबद्दलची माहिती एकत्र करून नगडा जवळ असलेल्या त्यांच्या घराच्या बगिच्यामध्ये हायड्रोपोनिक फार्मिंग द्वारे टोमॅटोची लागवड केली होती.हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ठरवले की बरेलीमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करायची.  या पद्धतीने त्यांनी स्ट्रॉबेरीची शेती करणे चालू केले.

 


अगोदर दर महिन्याला ऋचा यांना नोएडावरुन बरेलीला यावे लागायचे. परंतु मागच्या वर्षापासून त्या बरेलीला कायमस्वरूपी राहतात. सौरभ सिंह, उनके पिता रिटायर्ड बँक मॅनेजर श्याम पाल सिंह आणि एमसीएचं शिक्षण घेणारी ऋचा यांनी घराजवळ असलेल्या हजार वर्ग फुटाच्या खाली असलेल्या प्लॉटवर स्ट्रॉबेरीची शेती करण्याची तयारी सुरू केली. नेट कपमध्ये नारळची शेंडी भरून स्ट्रॉबेरी चालू रोपांची लागवड केली. नंतर नेट कप पाईपलाईनला कनेक्ट केले. ज्यामुळे प्रति एक फुटावर क्षीद्र बनवले त्याचा फायदा असा झाला की टँकरद्वारे सगळ्या रुपांना पाणी सोबत नायट्रोजन, फास्फोरस फॉस्फरस,पोटॅश,कॅल्शियम, सल्फर सल्फर,झिंकचा पुरवठा व्यवस्थित करता येतो. टॅंकमध्ये दर दोन महिन्यांनी पौष्टिक तरल भरला जातो. तापमान नियंत्रित करण्यासाठी प्लांटच्या वरच्या बाजूला पारदर्शक प्लास्टिक शीट लावण्यात आली आहे.  

हेही वाचा : कांदा बियाणाचा यशस्वी प्रवास : संदीप प्याजचा अख्या देशात डंका ; मिळवला राष्ट्रपतींकडून पुरस्कार

सौरभ सांगतात की, पाईपचे आठ लेयर बनवून त्यात ५ हजार ५०० रोपे लावण्यात आली आहेत.एका रोपाची किंमत १० रुपये प्रमाणे आहे. जे त्यांनी मुंबई वरून मागवले आहेत.या सगळ्या प्लॅनिंगमध्ये त्यांना जवळ-जवळ ४ लाख रुपये खर्च आला आहे.मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोपांची लागवड केली होती.त्यापासून ३ महिन्यांमध्ये उत्पन्न मिळाले. सामान्यपणे प्रत्येक रोपापासून एक किलोपर्यंत उत्पादन होते. दोन वर्षाचे झाल्यानंतर त्यापासून मिळणारे उत्पादनात वाढ होते. हे रोपे चार ते पाच वर्षांपर्यंत फळे देतात. मार्केटमध्ये यांचा दर २५० रुपये प्रति किलो आहे.पहिले उत्पादन त्यांना कमीत-कमी १२ लाख रुपयांचे मिळाले.


या सिझनमध्ये त्यांना १४  लाख रुपये पर्यंतचे उत्पादनाची अपेक्षा आहे. सौरभ सांगतात की, त्यांना जेव्हा संधी मिळते तेव्हा ते स्ट्रॉबेरीच्या शेतीकडे लक्ष देतात. हायड्रोपोनिक फार्मिंगची आयडिया त्यांना फार आवडली कारण यामध्ये फक्त पाण्याची गरज असते. मातीच्या आवश्यकता लागत नाही. या शेतीमध्ये इतर प्रकारच्या शेतीपेक्षा ४० टक्के कमी खर्च येतो. सौरभ यांचा मानस आहे की, स्वतःचा ब्रँड बनवून मार्केटमध्ये विक्री करायचे. यासह उद्यान आणि कृषी विभाग यांच्याद्वारे या उद्योगासाठी अनुदान दिले जाते. ज्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग आणि ड्रिप इरिगेशनसाठी ४०  ते  ५० टक्के सबसिडी मिळते.

English Summary: Hydroponic farming - invested Rs 4 lakh in five years, earned Rs 60 lakh
Published on: 05 November 2020, 05:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)