News

आपल्या बऱ्याचदा वाचण्यात किंवा ऐकण्यात येते की, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा माल घेतला आणि पैसे दिले नाहीत. असे फसवणूक करणारे व्यापारी अगोदर शेतकऱ्यांसोबत व्यवहार करताना अगदी चोख असा करतात.

Updated on 14 April, 2022 10:48 AM IST

आपल्या बऱ्याचदा वाचण्यात किंवा ऐकण्यात येते की, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा माल घेतला आणि पैसे दिले नाहीत. असे फसवणूक करणारे व्यापारी अगोदर शेतकऱ्यांसोबत व्यवहार करताना अगदी चोख असा करतात.

नंतर विश्वास संपादन झाल्यावर पैसे न देताच पोबारा करतात. हा प्रकार दरवर्षी द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत सर्रासपणे घडतो. एवढेच नाही तर शेतकरी अशा व्यवहारात कुठल्याही लिखित स्वरूपात ठोस पुरावा ठेवत नाहीत. त्याचा गैरफायदा व्यापारी किंवा  निर्यातदार घेतात. प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये नाशिक, सांगली आणि सातारा यांचा समावेश होतो. या ठिकाणीसुद्धा कुठलाही ठोस लिखित पुरावा नसतो.

नक्की वाचा:'शेतीचे राष्ट्रीयीकरण' संकल्पना अन शेतीसाठी सिंचनाची आवश्यकता याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

 या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेत व्यापारी किंवा निर्यातदार शेतकऱ्यांची दरवर्षी काही कोटी रुपयांची फसवणूक  करतात. तसे पाहायला गेले तर हे व्यापारी परराज्यातील असतात. परंतु स्थानिक दलालांच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संपर्क करून व्यवहार केला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळावी यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  डॉ. भारती पवार यांनी फसवणुकीचा तक्रारीसाठी हेल्पलाइन तयार केली जाणार असल्याचे सांगितले.

या वर्षीचा हंगामातील द्राक्षांची विक्री करताना विशेष काळजी घ्यावी या जनजागृतीसाठी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून फलकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी डॉ. भारती पवार यांनी द्राक्ष उत्पादकांच्या फसवणूकीबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि कृषी व पणन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भारती पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांकडून अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कुठलाही व्यवहार करण्याअगोदर संबंधित व्यापार्याची आधार कार्ड, त्याचे पॅनकार्ड एवढेच नाही तर त्याचा बँक खात्याचा तपशील देखील जाणून घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यापारी सोबत व्यवहार करायचा आहे त्याच्या बँक खात्याची सिबिल स्कोर चेक करून घेणे गरजेचे आहे. यामध्ये काही गडबड दिसली तर द्राक्ष विक्रीचा व्यवहार करू नये. या सगळ्या गोष्टी साठी हेल्पलाईन आता तयार केली जाणार आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना मारूनच, झाले महाभकास क्रांतीचे शिल्पकार !

 शिवारात खरेदी करायची तर पोलीस पाटलांची माहिती आवश्यक

 बरेच व्यापारी शेत शिवारामध्ये खरेदीसाठी येतात. अशा व्यापाऱ्यांचे तपशील पोलीस पाटला मार्फत घेऊन पोलिस ठाण्यांना कळविण्यात येतील. त्यानंतर संबंधित व्यापार्‍यावर काही गुन्हे दाखल आहेत का याची शहानिशा केली जाईल. म्हणून या माध्यमातून आता पोलीस यंत्रणा आणि पोलीस पाटील यांच्यात एक समन्वय साधून सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

English Summary: helpline create for grape productive farmer to avoid decisive from traders
Published on: 14 April 2022, 10:48 IST