News

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होऊ शकते. राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आज जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 19 September, 2022 12:00 PM IST

मुंबई: शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होऊ शकते. राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) संपणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आज जामीन (Bail) मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधी ५ सप्टेंबर रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने या जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ १९ सप्टेंबरपर्यंत केली होती. गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊतला 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती.

सुरुवातीला ईडीच्या कोठडीत राहिल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 22 ऑगस्ट रोजी विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतची कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती जी आता 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पेट्रोल डिझेलचे दर आज स्वस्त झाले का? जाणून घ्या आजच्या नवीन किंमती...

राऊतांना 31 जुलैच्या रात्री अटक करण्यात आली होती

विशेष म्हणजे अटकेनंतर न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी राऊतला आधी 4 ऑगस्ट, नंतर 8 ऑगस्ट आणि आता 22 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले. उपनगरीय गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता आणि पत्नी आणि कथित साथीदारांच्या मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहारांप्रकरणी केंद्रीय एजन्सीने 31 जुलैच्या रात्री राऊतला अटक केली होती.

लम्पी रोग रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले मोठे पाऊल; लादले हे निर्बंध

काय आहे पत्रा चाळ प्रकरण

पत्रा चाळ घोटाळा (Patra Chaal Scam) हा मुंबईच्या उपनगरातील गोरेगावच्या सिद्धार्थ नगरचा आहे. हा परिसर पत्रा चाळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे 47 एकरात पसरलेले असून एकूण 672 घरे आहेत.

याच पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील हेराफेरी प्रकरणाचा तपास आता ईडीच्या हाती आला आहे. पुनर्वसनाचे कंत्राट गुरु आशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड (GACPL) या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, 14 वर्षे उलटूनही लोकांना घर मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या:
इंजिनिअर दादा तुमचा नादच खुळा! मन की बात मधून प्रोत्साहित होत पिकवले ड्रॅगन फ्रूट; कमावतोय लाखों
पालक लागवड करून 20 दिवसांत करा 1 लाखांची कमाई; वापरा ही नवीन पद्धत

English Summary: Hearing today; Will Sanjay Raut get bail?
Published on: 19 September 2022, 12:00 IST