सध्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी ( Farmer Loss ) मेटाकुटीला आला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला फुकट वाटत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचा विडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नाशिकच्या पेठरोड येथील बाजार समितीत 1 रुपयाला कोथिंबीर जुडीचा मिळत असल्याने व्यापऱ्याला न देता रस्त्यावर येऊन फुकट वाटप केल्याचे समोर आले होते. त्यावरून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे हे सांगण्यासाठी दृश्य पुरेसे होते. फुकट घेणाऱ्या नागरिकांना जराही कीव येत नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिलीप सांगळे हे शेतकरी कोथिंबीर घेऊन विक्रीसाठी दाखल झाले होते. मात्र बरेच तास उलटून गेले तरी व्यापऱ्याने सांगळे यांची कोथिंबीर खरेदी केली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने सर्व कोथिंबीर परत गाडीत भरून रस्त्यावर आणली.दिलीप सांगळे हे शेतकरी कोथिंबीर घेऊन विक्रीसाठी दाखल झाले होते.
तू हुबेहूब सनी देओलसारखा दिसतोस, शेतकऱ्याने विचारताच सनी देओल म्हणाला मीच आहे..
असे असताना मात्र बरेच तास उलटून गेले तरी व्यापऱ्याने सांगळे यांची कोथिंबीर खरेदी केली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने सर्व कोथिंबीर परत गाडीत भरून रस्त्यावर आणली. नागरिकांना दिलीप सांगळे यांनी फुकट वाटली. यावेळेला अनेक नागरिकांनी ती हसत हसत घेत निघून गेले.
हजारो रुपये खर्च करून पिकवलेली कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आल्याने दिलीप सांगळे यांच्या डोळ्यात पाणी होते. दिलीप सांगळे यांच्या डोळ्याचा कडा पाण्याने ओल्या झालेल्या असतांनाही कुणी त्यांच्या खिशात दहा वीस रुपये बळजबरीने घातले नाही. याचे त्यांना मोठं दु:ख आहे.
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
शेतकऱ्याच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट असतांना मोठ्या धिटाईने तो संकटाला सामोरे जात आहे. फुकट भाजी वाटत असतांनाही नागरिक त्याची चेष्टा करत असल्याने त्याचे मोठं दु:ख आहे.
शेतकऱ्याच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट असतांना मोठ्या धिटाईने तो संकटाला सामोरे जात आहे. फुकट भाजी वाटत असतांनाही नागरिक त्याची चेष्टा करत असल्याने त्याचे मोठं दु:ख आहे.
महत्वाच्या बातम्या;
छत्रपती कारखाना लवकरच गतवैभव प्राप्त करणार, नवीन प्रकल्पाच्या कर्जाचा शेवटचा हप्ता राहिला...
कुमकुम भेंडीला ५०० रुपये किलोचा भाव, शेतकऱ्यांना आहे फायदेशीर..
याच्यापेक्षा वाईट दिवस काय असतील? शेतकऱ्यांच्या वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर...
Published on: 09 March 2023, 02:55 IST