सध्या राज्यातील दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एक खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे.
दरम्यान, कोरोनानंतर रेल्वे थांबे पूर्ववत करावे आणि इतर मागण्या खासदार मंडळींनी केल्या होत्या. रेल्वे अधिकारी यांचा मनमानीपणे कारभार सुरू आहे. या मनमानीला कंटाळून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आहेत, तसेच ओमराजे निंबाळकर या समितीचे सदस्य आहेत.
या दोघांच्या तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. या बोर्डाची बैठक पुण्यात झाली. यावेळी खासदारांच्या मोठा वाद झाला. या समितीमध्ये एकूण ३६ खासदार सदस्य आहेत. यामध्ये अध्यक्षांसह इतर खासदारांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रेल्वे विभागाच्या बैठकीत वाद झाल्यानंतर रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य असणाऱ्या खासदारांनी राजीनामे दिले.
बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता, यामुळेच महाराष्ट्रात तुफान पाऊस..
दरम्यान, वारंवार मागणी करूनही रेल्वे बोर्ड सदस्य असणाऱ्या खासदारांच्या मागणीला किंमत देत नसल्याने या रेल्वे मंडळाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहोत, यापुढे रेल्वे मंडळाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे निंबाळकर यांनी सांगितले आहे. त्यांनी यामध्ये काही मागण्या केल्या होत्या.
म्हशीची ही जात 700 ते 1200 लिटर दूध देते, दूध उत्पादकांना मिळणार बंपर कमाई
यामध्ये कोरोनापूर्वी ज्या स्थानकावरती रेल्वे थांबा होता, तेथे पुन्हा थांबा मिळावा, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांचे प्रश्न सुटावेत, भुयारी मार्ग, आणि दोन गावांना जोडणारे रस्ते जे रेल्वे अधिकार क्षेत्रात येतात ते दुरुस्त करावेत, कुर्डूवाडी रेल्वे डब्याचा कारखाना चालू रहावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही.
महत्वाच्या बातम्या;
उद्घाटनासाठी गेले आणि लिलावच पुकारला, शेतकऱ्यांसमोर छगन भुजबळ यांचा वेगळा अंदाज
कृषी विकास परिषद 2022: सेंच्युरियन वर्ल्ड स्कूल येथे कृषी विकास परिषद
बंगालच्या उपसागरात धडकणार चक्री वादळ, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती
Published on: 19 October 2022, 11:36 IST