News

राज्यात कृषी क्षेत्रात अधिकाधिक वृद्धी व्हावी यासाठी अनेक उपक्रमदेखील राबवले जातात. आज १ जुलै. महाराष्ट्र राज्यात १ जुलै 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. कृषी तज्ज्ञ तसेच पहिले शेतकरी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून राज्यभरात साजरा केला जातो.

Updated on 01 July, 2022 10:44 AM IST

ग्रामीण तसेच देशाच्या आर्थिक व्यवस्थेत शेती व्यवसायाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शेती व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतात. आज नाही म्हटलं तरी ७०% जनता ही शेती आणि शेती संबंधी व्यवसायाशी निगडित आहे. राज्यात कृषी क्षेत्रात अधिकाधिक वृद्धी व्हावी यासाठी अनेक उपक्रमदेखील राबवले जातात. आज १ जुलै. महाराष्ट्र राज्यात १ जुलै 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. कृषी तज्ज्ञ तसेच पहिले शेतकरी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून राज्यभरात साजरा केला जातो.

शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीवर निस्सीम भक्ती अशी वसंतराव नाईक यांची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल तसेच राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसे होईल यासाठी त्यांनी बऱ्याच उपाययोजना आखल्या. त्यांचे शेती क्षेत्रातील योगदान पाहून १९८९ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांचा जन्मदिवस म्हणून कृषी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून १ जुलै ला राज्यात कृषी दिन साजरा केला जातो.

प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण; 13 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

वसंतराव नाईक यांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं तसेच कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. साल 1972. जेव्हा राज्यात दुष्काळ पडला होता तेव्हा वसंतराव नाईक यांनी अनेक उपाययोजना आखल्या होत्या. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करून देणे, तसेच त्यांनी जलसंधारणाची कामे वाढवली. शेतीच्या विकासासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले त्यामुळे आज राज्याच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल आपल्याला दिसत आहे.

आज शेती व्यवसायात महाराष्ट्र राज्य देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जात आहे. मातीशी नाळ जोडले गेलेल्या त्या सर्व शेतकरी बंधूना कृषी दिनाच्या कृषी जागरणतर्फे मनापासून शुभेच्छा

महत्वाच्या बातम्या:
बातमी महागाईची! 'या' तारखेपासून होणार 'हे' खाद्यपदार्थ महाग, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची घोषणा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ...

English Summary: happy maharashtra agriculture day 2022
Published on: 01 July 2022, 10:44 IST