29 वे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शनाचे पुण्यात मोशी येथे भव्य उद्घाटन शेतकऱ्यांच्या गटातर्फे करण्यात आले.
यामध्ये गुजरातेतील राहुल पटेल, धुळे येथील दिगंबर पाटील, डहाणू येथील मिलिंद बाफना, तासगाव येथील सुशांत सावंत, नंदुरबार येथील संदीप पाटील तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले विविध शेतकरी यांचा या उद्घाटनाला मध्ये समावेश होता. हे प्रदर्शन 27 मार्चपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
अशी आहे कृषी प्रदर्शनाची तयारी?
हे कृषी प्रदर्शन पंधरा एकर क्षेत्रावर भरवण्यात आले असून यामध्ये 300 पेक्षा जास्त कंपन्या,विविध क्षेत्रातील संशोधन संस्था,नवउद्योजक तसेच शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करणार आहेत.पाच दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्येआतून एक लाखाहून अधिक शेतकरी येतील असा अंदाज आहे.
शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक विचार शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे हे या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, शेती क्षेत्रातील मान्यवर व संस्था यांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये शेती संबंधित विविध दालने उभी करण्यात आलेली आहे त्यामध्ये पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, संरक्षित शेती व पाण्याचे नियोजन, जैव तसेच ऊर्जा रोपवाटिका व शेती लघु उद्योग अशा दालनांचा समावेश आहे. यामध्ये विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना ते पाहायला मिळतील. एवढेच नाही तर शेतीमध्ये उपयोगात येणारी यंत्रे वविविध प्रकारचे उपकरणांचे प्रदर्शनशेतकऱ्यांना अगदी खुल्या जागेमध्ये पाहायला मिळणार आहे.विशेष म्हणजे सिंचन क्षेत्रांमध्ये लागणारे विविध तंत्रज्ञान ज्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहे अशा जवळ जवळ 80 कंपन्यांचे यामध्ये सहभाग घेतला आहे.
मोबाईलचा वाढता वापर तसेच डिजिटल इंडिया इत्यादी उपक्रमांमुळेशेतकऱ्यांसोबत संवाद साधणे अगदी सोपे झाले आहे.
या कारणाने नवनवीन उद्योजकसेवा उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत.या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवनवीन तंत्रज्ञान व त्या तंत्रज्ञानाचा वापर व अशा तंत्रज्ञानाने निर्माण होणाऱ्या संधी इत्यादी शेतकऱ्यांना माहिती होणार आहेत. तसेच नवनवीन उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवल्याने यामुळे बाजार भाव, पाणी व्यवस्थापन व शेती मालाचे मूल्यवर्धन तसेच जैवतंत्रज्ञानया क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येणार आहेत.
Published on: 25 March 2022, 03:57 IST